मुंबई : फूड डिलिव्हरी अॅप स्विगीने आयपीएल अंतिम सामन्यादरम्यान केलेल्या एका ट्वीटने चांगलीच खळबळ उडाली आहे. या ट्वीटमध्ये स्विगीने कंपनीकडून 2423 कंडोमची डिलिव्हरी झाल्याचं सांगण्यात आलं आहे. पावसादरम्यान गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना थांबवण्यात आला. तसेच डकवर्थ लुईस नियमानुसार रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी नव्या टार्गेटसह सामना खेळण्याचं ठरवलं गेलं. या दरम्यान रात्री 8 वाजून 43 मिनिटांनी स्विगीने कंडोमबाबत ट्वीट केलं आणि जोरदार चर्चा रंगली. हे ट्वीट जोरकसपणे व्हायरल होऊ लागलं. पहिल्यांदा या ट्वीटचा अर्थ कुणाला लागलाच नाही. या ट्वीटमुळे सर्वच बुचकळ्यात पडले. मात्र त्यानंतर मजेशीर ट्वीट सर्वांच्या लक्षात आलं आणि हास्यकल्लोळ झाला.
स्विगीने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, “आतापर्यंत @SwiggyInstamart च्या माध्यमातून 2423 कंडोम डिलिव्हरी करण्यात आले आहेत. असं वाटतंय की आज रात्री 22 पेक्षा अधिक खेळाडू खेळणार आहेत.” विशेष म्हणजे स्विगीने हे मजेशीर ट्वीट कंडोम ब्रँड ड्युरेक्स इंडियालाही टॅग केलं आहे.
2423 condoms have been delivered via @SwiggyInstamart so far, looks like there are more than 22 players playing tonight ? @DurexIndia
— Swiggy (@Swiggy) May 29, 2023
स्विगीने असंच एक ट्वीट 2023 नववर्षाच्या स्वागतावेळी केलं होतं. तेव्हा स्विगीने लिहिलं होतं की, ड्युरेक्स कंडोमचे2757 पॅकेट्स स्विगी इन्स्टामार्टच्या माध्यमातून डिलिव्हर करण्यात आले आहेत. प्लीज आणखी 4212 ची ऑर्डर करा म्हणजे 6969 आकडा पूर्ण होईल. तेव्हा आपण बोलू शकतो खूप छान”
This is real level of Swiggy ?
— Shubman Gang (@ShubmanGang) May 29, 2023
आयपीएल फायनल दरम्यान स्विगीचं हे ट्वीट पाहिल्यानंतर नेटकरी शांत कसे बसतील. त्यांनी या ट्वीट मजेशीर प्रतिक्रिया नोंदवण्यास सुरुवात केली. दुसरीकडे, प्रतिक्रिया पाऊस सुरु असताना सामन्याचा निकालही लागला. हा सामना चेन्नई सुपर किंग्सने जिंकत जेतेपदावर नाव कोरलं.चेन्नई सुपर किंग्स हा सामना 5 गडी राखून जिंकला.
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या एलिमिनेटर सामन्यानंतरही स्विगीचं एक ट्वीट चर्चेत आलं होतं. या ट्वीटमध्ये नवीन उल हकला डिवचण्यात आलं होतं. सामन्यात लखनऊने मुंबईला पराभूत केलं होतं.”एका व्यक्तीने बंगळुरुमधून नुकतीच 10 किलो आंब्यांची ऑर्डर दिली आहे.”, असं ट्वीट केलं होतं. विराट कोहली बंगळुरुकडून खेळत असल्याने हे ट्वीट केल्याचं नेटकरी सांगत होते.