सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 स्पर्धेत आतापर्यंत टीम इंडियाच्या अनेक अनुभवी आणि युवा खेळाडूंनी धमाका केला आहे. आता त्या यादीत टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचा समावेश झाला आहे. भुवनेश्वर कुमार याने आपल्या धारदार बॉलिंगने कमाल केली आहे. भुवनेश्वरने झारखंड विरूद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेत दाणादाण उडवली आहे. भुवीने घेतलेल्या या हॅटट्रिकमुळे युपीला झारखंडवर 10 धावांनी मात करता आली. नक्की काय झालं सविस्तर जाणून घेऊयात.
उत्तर प्रदेशने या सामन्यात निर्धारित 20 षटकांमध्ये 8 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. रिंकु सिंह याने 28 बॉलमध्ये 45 धावा केल्या. तर प्रियम गर्ग याने 25 चेंडूत 31 धावांचं योगदान दिलं. झारखंड टीम 161 या विजयी धावांचा पाठलाग करताना 19.5 ओव्हरमध्ये 150 धावांवर ढेर झाली. भुवनेश्वर कुमारने घेतलेल्या हॅटट्रिकमुळे उत्तर प्रदेशला 10 धावांनी विजय मिळवता आला. भुवनेश्वरने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात झारखंडला सलग 3 बॉलमध्ये 3 झटके देत ही हॅटट्रिक घेतली.
भुवनेश्वरने झारखंडच्या डावातील 17 व्या ओव्हरमधील पहिल्या 3 चेंडूत विकेट्स घेत हॅटट्रिक घेतली. भुवीने रॉबिन मिन्झ याला प्रियम गर्गच्या हाती 11 धावांवर कॅच आऊट केलं. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर बाल कृष्ण याला पहिल्याच बॉलवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. भुवीने यासह 2 बॉलमध्ये 2 विकेट्स मिळवल्या. त्यामुळे आता भुवी हॅटट्रिकवर होता. भुवी हॅटट्रिक घेतो की नाही? याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. भुवीने विवेकानंद तिवारी याला पहिल्याच बॉलवर बोल्ड करत हॅटट्रिक घेतली. भुवीच्या या हॅटट्रिकमुळे झारखंडची स्थिती 116-5 वरुन 116-8 अशी झाली. भुवनेश्वर कुमारने त्याच्या कोट्यातील 4 पैकी 1 ओव्हर मेडन केली. भुवीने फक्त 6 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या आणि सामना फिरवला.
दरम्यान भुवीने हॅटट्रिक घेतल्याने आरसीबीच्या गोटात आनंदाच वातावरण आहे. हैदराबादने भुवीला मेगा ऑक्शनआधी रिलीज केलं होतं. त्यानंतर आरसीबीने आयपीएल मेगा ऑक्शन 2025 मधून भुवनेश्वर कुमार याला आपल्या गोटात घेतलं आहे. भुवीची यासह घरवापसी झाली. भुवीने आरसीबीकडून खेळताना आयपीएल कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर आता भुवीने हॅटट्रिक घेतल्याने आरसीबी आणि टीम मॅनेजमेंटमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
भुवीची हॅटट्रिक, पाहा व्हीडिओ
1⃣6⃣.1⃣ – Wicket ✅
1⃣6⃣.2⃣ – Wicket ✅
1⃣6⃣.3⃣ – Wicket ✅Watch Bhuvneshwar’s terrific hat-trick that helped Uttar Pradesh beat Jharkhand at the Wankhede Stadium in Mumbai 👌👌#SMAT | @IDFCFIRSTBank
Scorecard ▶️ https://t.co/iZkdrM9S0S pic.twitter.com/p6V6hqkqh1
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 5, 2024
उत्तर प्रदेश प्लेइंग ईलेव्हन : भुवनेश्वर कुमार (कॅप्टन), माधव कौशिक, आर्यन जुयाल (विकेटकीपर), प्रियम गर्ग, नितीश राणा, रिंकू सिंग, समीर रिझवी, विपराज निगम, शिवम मावी, मोहसिन खान आणि विनीत पनवार.
झारखंड प्लेइंग इलेव्हन : विराट सिंग (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), उत्कर्ष सिंग, कुमार कुशाग्र, अनुकुल रॉय, पंकज किशोर कुमार, रॉबिन मिंज, बाल कृष्णा, विवेकानंद तिवारी, विकास सिंग आणि विकास कुमार.