पुद्देचरी | साऊथ झोन क्रिकेट टीमने देवधर ट्रॉफी जिंकली आहे. साऊथ झोनने ईस्ट झोनवर अंतिम सामन्यात 45 धावांनी विजय मिळवला आणि देवधर ट्रॉफीवर नाव कोरलं. साऊथ झोनने ईस्ट झोनला विजयासाठी 329 धावांचं आव्हान दिलं होतं. ईस्ट झोननेही चांगली झुंज दिली. मात्र ईस्ट झोन 46.1 ओव्हरमध्ये 283 धावांवर ऑलआऊट झाली. ईस्ट झोनकडून रियान पराग याने झुंजार खेळी करत एकाकी झुंज दिली.मात्र रियानला दुसऱ्या बाजूने कुमार कुशाग्रा याचा अपवाद वगळता एकाचीही साथ मिळाली नाही.
ईस्ट झोनकडून रियान पराग याने एकाकी खिंड लढवली. तर कुमार कुशाग्रा यानेही चांगली कामगिरी केली. यामुळे सामना शेवटपर्यंत जाऊ शकला. ईस्ट झोनकडून रियान पराग याने 95 धावांची खेळी केली. तर कुमार कुशाग्रा याने 68 रन्स केल्या. सुदीप घरामी याने 41 धावा जोडल्या. तर कॅप्टन सौरभ तिवारी 28 धावा करुन तंबूत परतला. शहबाज अहमदने 17 रन्स केल्या. तर या 5 जणांचा अपवाद वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.आकाश दीप 7 धावांवर नाबाद राहिला.
साऊथ झोनकडून वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. विद्वत कवेरप्पा, वासुकी कौशिक आणि
विजयकुमार विशक या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर रविश्रीनिवासन साई किशोर याने 1 विकेट घेतली.
दरम्यान त्याआधी साऊथ झोनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. रोहन कुन्नम्मल याच्या शतक आणि एन जगदीसन याच्या अर्धशतकाच्या जोरावर साऊथ झोनने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 328 धावा केल्या. शाहबाज अहमद, रियान पराग आणि उत्कर्ष सिंह या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर एम मुरासिंह आणि आकाश दीप या दोघांच्या खात्यात प्रत्येकी 1-1 विकेट गेली.
साऊथ झोनने देवधर ट्रॉफी जिंकली
????? ???? are WINNERS of the #DeodharTrophy 2023-24! ?
Congratulations to the @mayankcricket-led unit ??
East Zone fought hard in a high-scoring battle here in Puducherry ??
Scorecard – https://t.co/afLGJxp77b#Final | #SZvEZ pic.twitter.com/x6PEjFp5Pr
— BCCI Domestic (@BCCIdomestic) August 3, 2023
साऊथ झोन प्लेईंग इलेव्हन | मयंक अग्रवाल (कॅप्टन), अरुण कार्तिक, रोहन कुन्नम्मल, साई सुधरसन, एन जगदीसन (विकेटकीपर), रोहित रायडू, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, वासुकी कौशिक, विजयकुमार विशक आणि विद्वत कवेरप्पा.
ईस्ट झोन प्लेईंग इलेव्हन | सौरभ तिवारी (कॅप्टन), अभिमन्यू ईश्वरन, उत्कर्ष सिंग, विराट सिंग, रियान पराग, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), शाहबाज अहमद, मणिशंकर मुरासिंग, आकाश दीप, सुदीप कुमार घरामी आणि मुख्तार हुसेन.