वर्ल्ड कपमधील 25 वा सामना टीम इंडिया आणि अमेरिकेमध्ये पार पडला. या सामन्यामध्ये 7 विकेटने टीम इंडियाने विजय मिळवला. टीम इंडियाने टॉस जिंकत अमेरिका संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं होतं. पहिल्यांदा बॅटींग करताना अमेरिका संघाने 20 ओव्हर 110-8 धावा केल्या होत्या . या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने 18.2 ओव्हरमध्ये 113-3 पूर्ण केलं. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील हा सलग तिसरा विजय ठरला आहे. हा सामना अशा दोन खेळाडूंनी जिंकवला ज्यांना आजच्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये ठेवण्यावरून टीका केली जात होती.
अमेरिका संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू लवकर बाद झाले. रोहित शर्मा 3 धावा आणि विराट कोहली 0 धावा करून स्वस्तात बाद झाले. त्यानंतर नेहमीप्रमाणे ऋषभ पंत याने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली खरी पण स्लोच पिचवर तोसुद्धा आज बाद झाला. पंत गेल्यावर सामना अवघड वाटू लागला होता. कारण त्यानंतर मैदानात असलेले सुर्यकुमार यादव आणि शिवम दुबे दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये नव्हते. त्यात पिच बॅटींसाठी एकदम खराब काहीच मदत मिळत नव्हती. त्यामुळे टीम इंडियावर आलेला दबाव दिसू लागला होता.
सुर्यकुमार यादव आणि शिवन दुबे यांनी एकेरी-दुहेरी धाव घेत विजयाचा पाया रचला. त्यानंतर काहीसा जम बसल्यावर दोघांनीही दोन ते तीन मोठे फटके खेळले. त्यानंतर सामना भारताच्या बाजूने झुकला. सुर्यकुमार यादव याने नाबाद ५० (दोन चौकार, दोन षटकार() तर शिवम दुबे नाबाद ३१ (१ चौकार, १ षटकार) खेळी करत संघाचा विजय साकार केला.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.
युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: आरोन जोन्स (कर्णधार), स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (डब्ल्यू), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.