टीम इंडिया आणि अफगाणिस्तानमधील सामन्यात भारताच्या शिलेदारांनी दमदार विजय मिळवला. सुरूवातीला टीम इंडियाचे प्रमुख तीन फलंदाज स्वस्तात परतल्याने काहीसं दबाव निर्माण झाला होता. मात्र सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनी टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहोचवलं. सूर्याने 53 धावांची अर्धशतकी खेळी करत परत टी-20चा किंग का बोलतात हे दाखवून दिलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यानंतर मोर्चा आपल्याकडे घेतला अफगाणिस्तानचा टप्प्यात कार्यक्रम लावला. यामध्ये यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सुरूवातीपासूनच प्रभावी कामगिरी करत बुमराहने वर्ल्ड क्लास बॉलर का बोलतात दाखवून दिलं. कॅप्ट रोहित शर्मानेही त्यांचं तोंडभरून कौतुक केलं. सामन्यानंतर टीम इंडियाचा ऑल राऊंडर अक्षर पटेल याने बुमराहबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
आमच्याकडे सगळे दर्जेदार गोलंदाज आहेत, यामधील जसप्रीत बुमराह हा तर जागतिक दर्जाचा गोलंदाज असून आमचे बॉलिंग कोच पारस म्हाम्ब्रे यांनाही त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण ते कधीच बुमराह जास्तीचा सल्ला देत नाहीत. जस्सीला त्यांनी सामन्यामध्ये जे काही करायचं आहे ते करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. कारण बुमराहलाही माहित आहे कोणत्या वेळी काय करायला हवं आणि कोणत्या वेळी काय करायला नाही पाहिजे. बॉलिंग कोच तर त्याला सल्ला देऊन गोंधळात टाकत नाहीत. ते सांगतात की तुला त्यावेळी परिस्थिती पाहून जो योग्य निर्णय वाटेल तो घेऊन तशा प्रकारे बॉलिंग कर, असं सांगत असल्याचं अक्षर पटेल याने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.
अफगाणिस्ताविरूद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने नेहमीप्रमाणे दमदार गोलंदाजी केली. आपल्या स्पेलमध्ये जसप्रीत बुमराहने 4 ओव्हरनमधील 1 ओव्हर मेडन टाकत अवघ्या 7 धावा देत तीन विकेट मिळवल्या. जसप्रीत बुमराहच्या चार ओव्हर सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरतात. याचा प्रत्यय यंदाच्या भारत-पाक सामन्यामध्ये आला. अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 181-8 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तान संघाला 20 ओव्हरमध्ये फक्त 134 धावाच करता आल्या.
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.