T-20 World Cup Women Final : टी- 20 महिला वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. निर्धारित 20 षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने 157 धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दिलं आहे. सलामीवीर बेथ मुनीने नाबाद 74 धावांच्या तुफानी अर्धशतकी खेळीने ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या करण्यात मोलाची भूमिक बजावली. तर आफ्रिकेच्या शबनम इस्माईल आणि मारिझने कॅप यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाची सुरूवात चांगली झाली होती. पॉवरप्लेच्या पाचव्या षटकात पहिलं यश मारिझने कॅपने मिळवून दिलं. दुसरीकडे बेथ मुनीने एक बाजू लावून धरली होती. मात्र इतर फलंदाज भागीदारी करण्यासाठी कमी पडताना दिसले.
अॅशले गार्डनरने दमदार सुरूवात केली होती. मोठी खेळी करण्यात तिला अपयश आलं. 29 धाव करून ती माघारी परतली, त्यानंतर आलेल्या ग्रेसलाही फार काही कमाल दाखवता आली नाही. कर्णधार मेग लॅनिंगही मारिझने कॅपची शिकार झाली 10 धावा करुन माघारी परतली.
शेवटच्या षटकामध्ये ऑस्ट्रेलियाच्या दोन विकेट्स गेल्या. चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर गडी बाद झाले. बेथ मुनीने एकटीने खिंड लढवली आणि संघाला 150 टप्पा ओलांडून दिला. फायनलमध्ये बेथ मुनीने नाबाद 74 धावांची खेळी केली. यामध्ये 9 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. गार्डनर सोडता इतर कोणत्याही खेळाडूने मोठी खेळी केली नाही.
दक्षिण आफ्रिकेकडून शबनम इस्माईल आणि मारिझने कॅप यांनी दोन आणि नॉनकुलुलेको मलाबा आणि क्लो ट्रायऑनस यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. आता यजमान आफ्रिकेचा संघ विजयापासून एक पाऊल दूर आहे. तर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपची ट्रॉफीवर पुन्हा नाव कोरण्यासाठी तयार असतील. आफ्रिका संघ सामना जिंकतो काही याकडे अवघ्या क्रीडा विश्वाचं लक्षल लागलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ – एलिसा हिली, बेथ मूनी, अशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, मेग लॅनिंग, एलिसे पेरी, जॉर्जिया वारेहम, ताहिला मॅकग्राथ, जेस जोनास्सेन, मेगन स्कट, डार्सी ब्राउन
दक्षिण आफ्रिका संघ – लॉरा वॉलवॉर्ड्ट, ताझमिन ब्रिट्स, मरिझेन कॅप्प, सुने ल्यूस, क्लोइ ट्रायन, नादिन डी क्लर्क, अन्नेक बॉश, सिनालो जाफ्ता, शबनिम इस्माईल, अयाबोंगा खाका, नोनकुलुलेको म्लाबा