लंडन | आयपीएल 16 व्या मोसमात गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील क्रिकेट सामन्याचा निकाल हा शेवटच्या बॉलवर लागला. केकेआरला त्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये 30 धावांची गरज होती. तेव्हा उमेश यादव याने रिंकू सिंह याला 1 रन काढून स्ट्राईक दिली. त्यानंतर रिंकून सलग 5 बॉलमध्ये 5 सिक्स ठोकत केकेआरला विजयी केलं. केकेआरला शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज असताना रिंकू सिंह सिक्स ठोकत सनसनाटी विजय मिळवून दिला होता. त्याच प्रकारे एका टी 20 लीग स्पर्धेत एका टीमला विजयासाठी शेवटच्या बॉलवर 5 धावांची गरज होती. त्या सामन्यात नक्की काय थरार रंगला, हे आपण जाणून घेऊयात.
इंग्लंडमध्ये टी 20 ब्लास्ट 2023 ही स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत शुक्रवारी 16 जून रोजी डरहम विरुद्ध डर्बीशायर यांच्यात सामना पार पडला. डर्बीशायरने टॉस जिंकून डरहमला बॅटिंगसाठी बाग पाडलं. डरहमने 20 ओव्हरमध्ये ऑलआऊट 178 धावा केल्या. त्यामुळे डर्बीशायरला विजयासाठी 179 धावांचं आव्हान मिळालं. डर्बीशायरकडून ब्रायडन कार्स याने सर्वाधिक 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर डरबनकडून झमान खान आणि झॅक चॅपेल या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या.
डर्बीशायर 179 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आली. डर्बीशायरने शेवटच्या ओव्हरपर्यंत शानदार पाठलाग केला. लुईस रीस याने 58, हॅरी केम याने 34, वेन मॅडसेन 20, कॅप्टन ल्यूस डू प्लॉय याने 13 आणि ब्रुक गेस्ट याने 5 धावा केल्या. त्यानंतर हैदर अली आणि मॅटी मॅककिर्नन ही जोडी मैदानात होती. या दोघांनी डर्बीशायरचं सामन्यातील आव्हान कायम राखलं.
आता डर्बीशायरला विजयासाठी शेवटच्या म्हणजेच 20 व्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज होती. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी गोलंदाज वेन पार्नेल शेवटची निर्णायक ओव्हर टाकायला आला. पार्नेलने पहिल्या 5 बॉलमध्ये फक्त 5 धावा दिल्या.
त्यामुळे आता डर्बीशायरला विजयासाठी 1 बॉलमध्ये 5 धावांची गरज होती. स्ट्राईकवर हैदर अली खान होता. आता जिंकायचं म्हंटल्यावर सिक्स पाहिजेच होता. पार्नेलने पहिल्या 5 चेंडूत 5 धावा दिल्या होत्या. इतकंच काय, तर पार्नेलने आपल्या स्पेलमधील याआधीच्या ओव्हरमध्ये 7 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे पार्नेल ही मॅच काढेल, असा विश्वास डरहम टीमला होता.
शेवटचा बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज. दोन्ही संघाच्या समर्थकांची धाकधुक वाढलेली. पार्नेलने शेवटच्या ओव्हरमधील शेवटचा बॉल टाकला. हैदरने या बॉलवर चौका मारला. हैदरने चौका मारल्याने सामना टाय झाला. त्यामुळे डर्बीशायरचा स्कोअरही 20 ओव्हरमध्ये 5 बाद 178 इतका झाला.
शेवटच्या ओव्हरचा थरार
हैदरला डर्बीशायरला विजयी करता आलं नाही, मात्र डरहमच्या तोंडातला विजयाचा घास हिसकावून घेतला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या स्पर्धेत सुपर ओव्हरचा नियम नाही. त्यामुळे सामन्याचा अंतिम निकाल हा टाय असाच निघाला. हैदर अली 26* आणि मॅटी मॅककिर्नन 10* नाबाद धावा करुन ही जोडी परतली. तर डरहमकडून वेन पार्नेल याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर नॅथन सॉटर आणि पॉल कफलिन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
सामना टाय
Lord Haider Ali made 26*(13) at No.5 for Derbyshire. 5 runs were needed off the last ball and he scored 4 to tie the game. Vitality Blast has no Super over rules so it will remain a tie. pic.twitter.com/d5UU0yuUJk
— Nawaz ?? (@Rnawaz31888) June 16, 2023
ल्यूस डू प्लॉय (कॅप्टन), लुईस रीस, हैदर अली, हॅरी केम, वेन मॅडसेन, ब्रुक गेस्ट (विकेटकीपर), मॅटी मॅककिर्नन, झॅक चॅपेल, मार्क वॉट, जॉर्ज स्क्रिमशॉ आणि जमान खान.
अॅलेक्स लीस (कर्णधार), मायकेल जोन्स, ऑलिव्हर रॉबिन्सन (विकेटकीपर), अॅश्टन टर्नर, बास डी लीडे, ब्रायडन कार्स, पॉल कफलिन, ल्यूक डोनेथी, वेन पारनेल, नॅथन सॉटर आणि लियाम ट्रेवास्किस.