IND vs PAK : टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

| Updated on: Oct 19, 2024 | 7:23 PM

India A vs Pakistan A Toss : टीम इंडिया ने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध नाणफेक जिंकून फलंदाजाची निर्णय घेतला आहे. जाणून घ्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळाली?

IND vs PAK : टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
India A vs Pakistan A Toss Emerging Teams Asia Cup 2024
Image Credit source: acc x account
Follow us on

टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. तर टीम इंडियाची युवा ब्रिगेड तिलक वर्मा याच्या नेतृत्वात एमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया ए या मोहिमेतील सलामीचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान ए विरुद्ध भिडणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाने टॉस जिंकला. कॅप्टन तिलक वर्मा याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये तिलक वर्मासह सिनिअर टीममधील अभिषेक शर्मा याचाही समावेश आहे. त्यामुळे ही जोडी या स्पर्धेत कशी कामगिरी करते? हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

स्पर्धेबाबत थोडक्यात

या स्पर्धेचं आयोजन हे 18 ते 27 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये 15 सामने होणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हा या स्पर्धेतील चौथा सामना आहे. या 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. टीम इंडिया बी ग्रुपमध्ये आहे. टीम इंडियासह या ग्रुपमध्ये पाकिस्तान, यूएई आणि ओमानचा समावेश आहे. तर ए ग्रुपमध्ये बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि हाँगकाँगचा समावेश आहे. प्रत्येक टीम साखळी फेरीत 3 सामने खेळणार आहे. दोन्ही गटातील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर अंतिम सामना होईल आणि विजेता संघ निश्चित होईल.

टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

दुसरा सामना, विरुद्ध यूएई, 21 ऑक्टोबर.

तिसरा सामना, विरुद्ध ओमान, 23 ऑक्टोबर.

इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : तिलक वर्मा (कॅप्टन), अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), रमणदीप सिंग, अंशुल कंबोज, आयुष बदोनी, नेहल वढेरा, निशांत सिंधू, राहुल चहर, रसिक दार सलाम आणि वैभव अरोरा.

पाकिस्तान ए प्लेइंग ईलेव्हन : मोहम्मद हरीस (कॅप्टन आणि विकेटकीपर), यासिर खान, अराफत मिन्हास, ओमेर युसूफ, कासिम अक्रम, हसीबुल्ला खान, मेहरान मुमताज, अब्बास आफ्रिदी, शाहनवाज दहनी, अहमद दानियाल, मोहम्मद इम्रान आणि जमान खान.