AUS vs SCO: ऑस्ट्रेलिया स्कॉटलँड सामन्यात या खेळाडूंच्या कामगिरीवर असेल लक्ष, कोण ते जाणून घ्या

| Updated on: Jun 15, 2024 | 10:17 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँड यांच्यात होणार आहे. या सामन्यावर बरंच काही अवलंबून आहे. या सामन्यात स्कॉटलँडने विजय मिळवला तर पुढचं प्रवास निश्चित होईल. पण ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर इंग्लंड आणि स्कॉटलँड यांच्यातील निर्णय नेट रनरेटच्या आधारावर होईल.

AUS vs SCO: ऑस्ट्रेलिया स्कॉटलँड सामन्यात या खेळाडूंच्या कामगिरीवर असेल लक्ष, कोण ते जाणून घ्या
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील महत्त्वाचा सामना ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँड यांच्यात खेळला जाणार आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 35 वा सामना असून रविवारी सेंट लूसियाच्या ग्रोस आयलेटच्या डॅरेन सॅमी मैदानात हा सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी 6 वाजता सुरु होईल. या सामन्यात स्कॉटलँडने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तर सुपर 8 फेरीचं निश्चित होणार आहे. तर गतविजेत्या इंग्लंडचा पुढचा प्रवास थांबणार आहे. कारण स्कॉटलँडच्या खात्यात 5 गुण, तर इंग्लंडच्या खात्यात 3 गुण आहेत. त्यामुळे दोन्ही संघांचं जर तर आहे. स्कॉटलँडने शेवटचा सामना जिंकला तर 7 गुण होतील. तर इंग्लंडने नामिबियाला पराभूत केलं तरी पाचच गुण होतील त्यामुळे पुढच्या सुपर 8 फेरीच्या प्रवासाचं तिकीट स्कॉटलँडला मिळेल. पण ऑस्ट्रेलियाने स्कॉटलँडला पराभूत केलं आणि इंग्लंडने शेवटचा सामना जिंकला तर दोन्ही संघांचे समान पाच गुण होतील. अशा स्थिती दोन पैकी एका संघाचा पुढचा प्रवास नेट रनरेटवर ठरेल.

ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँड सामन्यात काही खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. या खेळाडूंकडे कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची ताकद आहे. स्कॉटलँडसारख्या संघाला दुबळं समजणं चांगलंच महागात पडू शकतं ते देखील तितकंच खरं आहे. ऑस्ट्रेलियाचे सात, तर स्कॉटलँडच्या 4 खेळाडूंवर या सामन्याची मदार असणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेड, मिचेल मार्श, डेविड वॉर्नर, ट्रेव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन आणि मिचेल स्टार्क हे खेळाडू आहेत. तर स्कॉटलँडकडून मॅथ्यू क्रॉस, रिची बेरिंगटन, जॉर्ज मुन्से आणि ब्रँडन मॅकमुलेन हे खेळाडू आघाडीवर आहेत.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

ऑस्ट्रेलियाचे संभाव्य प्लेइंग 11: ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, ॲश्टन अगर, जोश हेझलवुड.

स्कॉटलँडची संभाव्य प्लेइंग 11: जॉर्ज मुन्से, मायकेल जोन्स, ब्रँडन मॅकमुलेन, रिची बेरिंग्टन (कर्णधार), मॅथ्यू क्रॉस (विकेटकीपर), मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्हज, मार्क वॉट, क्रिस्टोफर सोल, सफियान शरीफ, ब्रॅड व्हील.