BAN vs NED: बांगलादेशचा नेदरलँड्सवर 25 धावांनी विजय, सुपर 8 चा दावा मजबूत

| Updated on: Jun 13, 2024 | 11:59 PM

Bangladesh vs Netherlands Match Result: बांगलादेशने नेदरलँड्सवर विजय मिळवला आहे. नेदरलँड्सची आयसीसी टी 20 वर्ल्ड कप इतिहासात बांगलादेशकडून पराभूत होण्याची तिसरी वेळ ठरली.

BAN vs NED: बांगलादेशचा नेदरलँड्सवर 25 धावांनी विजय, सुपर 8 चा दावा मजबूत
Bangladesh cricket team
Follow us on

बांगलादेश क्रिकेट टीमने नेदरलँड्सवर आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात 25 धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेशने नेदरलँड्सला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र नेदरलँड्सला 8 विकेट्स गमावून 134 धावाच करचा आल्या. बांगलादेशचा टी 20 क्रिकेटमधील नेदरलँड्स विरुद्धचा एकूण पाचवा आणि टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील तिसरा विजय ठरला. बांगलादेशने विजयासह सुपर 8 च्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. तर नेदरलँड्ससाठी पराभवानंतरही संधी आहे.

नेदरलँड्सने बांगलादेश विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना आश्वासक सुरुवात केली. मात्र नेदरलँड्सने एका टप्प्यानंतर सातत्याने विकेट्स गमावल्या. नेदरलँड्सच्या मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यातील एकालाही विजयी खेळी साकारता आली नाही. नेदरलँड्सकडून सायब्रँड एंजेलब्रेक्ट याने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली. तर विक्रमजीत सिंह आणि कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स या दोघांनी 26 आणि 25 धावा केल्या. तर मायकेल लेविट याने 18, मॅक्स ओडोड याने 12 धावा केल्या. तर आर्यन दत्त याने नाबाद 15 धावा केल्या. तर इतरांना विशे काही करता आलं नाही. बांगलादेशकडून रिषाद हौसेन याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तास्कि अहमद याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मुस्तफिजुर रहमान, तांझिम साकिब आणि महमदुल्लाह या तिघांनी 1-1 विकेट घेतली.

बांगलादेशची बॅटिंग

दरम्यान त्याआधी नेदरलँड्सचा कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स याने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. बांगलादेशसाठी शाकिब अल हसन याने सर्वाधिक 64 धावांची खेळी केली. तांझिद हसन याने 35 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी महमदुल्लाह याने 25 आणि जाकेर अली याने 14 धावा केल्या. तर नेदरलँड्सकडून आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर टीम प्रिंगलने 1 विकेट घेतली.

बांगलादेशचा दुसरा विजय

नेदरलँड्स प्लेइंग ईलेव्हन : स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), मायकेल लेविट, मॅक्स ओडोड, विक्रमजीत सिंग, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, लोगान व्हॅन बीक, टिम प्रिंगल, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन आणि विव्हियन किंगमा.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझिद हसन, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब आणि मुस्तफिजुर रहमान.