टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 13 व्या सामन्यात कॅनडाने आयर्लंडला विजयासाठी 138 धावांचं आव्हान दिलं आहे. कॅनडाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 137 धावा केल्या. कॅनडाकडून निकोलस कीर्टन याने सर्वाधिक 49 धावा केल्या. निकोलसने केलेल्या या खेळीमुळे कॅनडाला आयर्लंडसमोर सन्मानजनक आव्हान देता आलं. निकोलस व्यतिरिक्त विकेटकीपर बॅट्समन श्रेयस मोव्वा याने चांगली साथ देत 37 धावांची खेळी केली. आता आयर्लंड 138 धावा करुन सामना जिंकते की कॅनडा पहिला विजय मिळवते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
निकोलस कीर्टन आणि श्रेयस मोव्वा या दोघांचा अपवाद वगळता कॅनडाच्या इतर फलंदाजांना काही खास करता आलं नाही. निकोलस आणि श्रेयस या दोघांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीमुळे कॅनडाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. निकोलस आणि श्रेयस या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 75 धावांची महत्तवपूर्ण भागीदारी केली. निकोलसने 35 बॉलमध्ये 3 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 49 धावा केल्या. निकोलसला सलग दुसरं अर्धशतक ठोकण्याची संधी होती. मात्र त्याचं अर्धशतक अवघ्या 1 धावेने अधुरं राहिलं. निकोलसने यूएसए विरुद्धच्या सलामी सामन्यातही अर्धशतक ठोकलं होतं. तर श्रेयस मोव्वाने 3 चौकारांसह 36 चेंडूत 37 धावा केल्या.
कॅनडाकडून या दोघांव्यतिरिक्त आरोन जॉन्सने 14, प्रगत सिंह 18, नवनीत धालिवाल 6, दिलप्रीत बाजवा 7 आणि साद बिन झफर याने नॉट आऊट 1 धाव केली. आयर्लंडकडून क्रेग यंग आणि बॅरी मॅककार्थी या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मार्क एडेअर आणि गॅरेथ डेलेनी या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
कोण जिंकेल सामना?
A 🔝 bowling effort from the Irish bowlers restricts Canada to 137/7 in New York 👏#T20WorldCup | #CANvIRE | 📝: https://t.co/F8JWtzoZDe pic.twitter.com/xPfwOZhhXo
— ICC (@ICC) June 7, 2024
कॅनडा प्लेइंग ईलेव्हन: साद बिन जफर (कॅप्टन), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), दिलप्रीत बाजवा, डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी आणि जेरेमी गॉर्डन.
आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन: पॉल स्टर्लिंग (कर्णधार),अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल आणि क्रेग यंग.