CAN vs IRE Toss: आयर्लंडचा कॅनडा विरुद्ध टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, कोण उघडणार विजयाचं खातं?

| Updated on: Jun 07, 2024 | 8:20 PM

Canada vs Ireland Toss: आयर्लंडने आपल्या दुसऱ्या सामन्यात कॅनडा विरुद्ध टॉस जिंकला आहे. कॅनडा आणि यूएसए या दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे.

CAN vs IRE Toss: आयर्लंडचा कॅनडा विरुद्ध टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, कोण उघडणार विजयाचं खातं?
Canada vs Ireland Toss
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 13 व्या सामन्यात ए ग्रुपमधील कॅनडा विरुद्ध आयर्लंड आमनेसामने आहेत. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे नासाऊट काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क येथे करण्यात आलं आहे. पॉल स्टर्लिंग आयर्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर साद बिन जफर याच्याकडे कॅनडाची जबाबदारी आहे. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 32 मिनिटांनी टॉस झाला. आयर्लंडने टॉस जिंकला. कॅप्टन पॉल स्टर्लिंगने फिल्डिंगचा निर्णय घेत आयर्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

कॅनडाने आयर्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. कॅप्टन साद बिन जफर याने निखील दत्ता याला प्लेईंग ईलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. निखील दत्ता याच्या जागी जुनैद सिद्दीकी याचा समावेश करण्यात आला आहे. कॅनडा आणि आयर्लंड या दोन्ही संघांचा हा टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांना सलामीच्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

कॅनडा आणि आयर्लंड दोन्ही संघ ए ग्रुपमध्ये आहेत. कॅनडाला 2 जून रोजी वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात यजमान यूएसए टीमकडून पराभूत व्हावं लागलं. तर टीम इंडियाने आयर्लंडचा धुव्वा उडवत वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने आयर्लंडवर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. त्यामुळे आता कॅनडा आणि आयर्लंड दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. आता या दोघांपैकी कोणती टीम विजयी होते, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

आयर्लंडच्या बाजने नाणेफेकीचा कौल

कॅनडा प्लेइंग ईलेव्हन: साद बिन जफर (कॅप्टन), आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), दिलप्रीत बाजवा, डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी आणि जेरेमी गॉर्डन.

आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन: पॉल स्टर्लिंग (कर्णधार),अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल आणि क्रेग यंग.