WI vs ENG : सुपर 8 फेरीत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघ आमनेसामने, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि इतर बाबी

| Updated on: Jun 19, 2024 | 10:27 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. कारण या गटात दक्षिण अफ्रिकेसारखा दिग्गज संघ आहे. त्यामुळे पुढचा मार्ग सुकर होण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे.

WI vs ENG : सुपर 8 फेरीत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघ आमनेसामने, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि इतर बाबी
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे दोन संघ सामने आले आहेत. दोन्ही संघांची साखळी फेरीतील कामगिरीत फरक दिसून आला आहे. वेस्ट इंडिजने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकत सुपर 8 फेरी गाठली आहे. तर इंग्लंडला सुपर 8 फेरी गाठण्यासाठी खूपच दमछाक करावी लागली. अखेर नेट रनरेटच्या आधारावर पुढचं तिकीट मिळालं. त्यामुळे दोन्ही संघांची कामगिरी जरी वेगळी असली तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. वेस्ट इंडिजला घरच्या मैदानाचा फायदा होईल यात शंका नाही. तर गतविजेत्या इंग्लंडची पुढची कामगिरी कशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांनी दोन वेळा जेतेपदावर गवसणी घातली आहे. त्यामुळे हा सामना अतितटीचा होईल यात शंका नाही. दोन्ही संघ आतापर्यंत 29 वेळा आमनेसामने आले आहेत. यात वेस्ट इंडिजने 17, तर इंग्लंडने 12 सामन्यात विजय मिळवला आहे. इतकंच काय तर वर्ल्डकप स्पर्धेत वेस्ट इंडिज इंग्लंडवर भारी पडली आहे. दोन्ही संघ सहावेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला आहे.

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यातील सामना सेंट लूसियाच्या डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय मैदानात खेळला जाणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक आहे. त्यामुळे या मैदानाता आरामात 170-180 धावा होऊ शकतात. या मैदानात 21 टी20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 11वेळा जिंकला आहे. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांनी 10 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही बाजू पाहता नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल.

दोन्ही संघांचे खेळाडू

इंग्लंड संघ: फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपली, मार्क वुड, बेन डकेट, विल जॅक्स, टॉम हार्टले.

वेस्ट इंडिज संघ: ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोती, ओबेद मॅककॉय, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, शिमरोन हेटमायर, शामर जोसेफ