यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वात मोठा उलटफेर म्हणजे ऑस्ट्रेलिया टीम सेमी फायनल खेळत नाहीये. सुपर-8 मधील एका पराभवामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी झाला त्यानंतर सलग झालेल्या दुसऱ्या पराभवामुळे यंदा ते सेमी फायनल गाठू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियासारखा तगडा संघ सेमी फायनलबाहेर असल्याने क्रिकेट विश्वात याची जोरदार चर्चा आहे. टीम इंडियाचा पराभव केला असता तर त्यांना संधी होती पण त्यांच्या पदरी अपयश आलं. टीम इंडियाने आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर कांगारूंना रोखलं आणि वन डे वर्ल्ड कपमधील फायनलचा बदला पूर्ण केला. या सगळ्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार खेलाडू डेव्हिड वॉर्नर याने निवृत्ती घेतली त्याच जास्त कोणती चर्चा झाली नाही. मात्र टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंह याने वॉर्नरच्या निवृत्तीनंतर एक ट्विट करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कोणालाही शांतपणे निरोप घ्यायला आवडत नाही, पण तो जीवनाचा खेळ आहे मित्रा.” डेव्हिड वॉर्नर, अविश्वसनीय कारकिर्दीसाठी तुझे अभिनंदन. मैदानावर चौकार मारण्यापासून ते बॉलीवूडचे मुव्ह आणि डायलॉग बोलण्यापर्यंत, हे सर्व तू वॉर्नर शैलीत केलेस. एक खतरनाक फलंदाज, एक जीवंत टीममेट आणि मैदानावर आणि मैदानाबाहेर खरा मनोरंजन करणारा. मित्रा तुझ्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करताना खरोखरच आनंद झाला. असेच तू चांगले करत राहा. आपल्या कुटुंबासह चांगला वेळ घालव, असं युवराज सिंह याने म्हटलं आहे.
No one likes a quiet goodbye, but that’s the game of life mate. Well done on an incredible career @davidwarner31 !
From smashing boundaries on the park to nailing Bollywood moves and dialogues, you’ve done it all in true #Warner style.
A feared batsman, a lively teammate and… pic.twitter.com/kPfTvcvXl6
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) June 26, 2024
डेव्हिड वॉर्नर भारतातही प्रसिद्ध आहे. पुष्पा चित्रपटामधील दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनसारखी तो स्टेप भर सामन्यात करतो. आयपीएल किंवा भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये फिल्डिंग करताना चाहत्यांचं मनोरंजन करतो. आता हा चॅम्पियन खेळाडू क्रिकेटच्या मैदानात दिसणार नाही. वॉर्नरने आपल्या संघाला अनेक सामन्यात एकहाती विजय मिळवून दिले आहेत. आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्त्वात वॉर्नरने सनरायजर्स हैदराबाद संघाला विजय मिळवून दिलेला.