टी-20 वर्ल्ड कप 2024 ची दुसरी फायनल काही वेळात सुरू होणार आहे. या सामन्याकडे अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेलं असणार आहे. टीम इंडियाला मागील सेमी फायनलमध्ये पराभवाला सामोर जावं लागलं होतं. त्यावेळी इंग्लंड संघानेच टीम इंडियाला बाहेर करत फायनलचं स्वप्न मोडलं होतं. या पराभवाचा बदला घेण्याची संधी रोहित शर्मा अँड कंपनीला असणार आहे. या सामन्यात एक असा खेळाडू आहे ज्याने टीम इंडिया जितक्या वेळा सेमी फायनलमध्ये गेलीये तितक्या वेळा अर्धशतक ठोकलंय. आजच्य सामन्यात या खेळाडूकडून सर्वांनाच मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. मात्र हा खेळाडू असा आहे ज्याने अर्धशतकी खेळी केल्यावर टीम इंडियाला खास असं यश मिळालेलं नाही.
हा खेळाडू आहे तरी कोण? ज्याने टीम जेव्हा जेव्हा सेमी फायनलमध्ये गेली तेव्हा अर्धशतक केलं आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून विराट कोहली आहे. विराट कोहली याने आपल्या करियरमधील पहिला टी-20 वर्ल्ड कप 2012 साली खेळला होता. तेव्हापासून टीम इंडियाने एक दोनदा नाहीतर तीनवेळा सेमी फायनल गाठली आहे.
2014 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा सामना झाला होता. त्या सामन्यातही विराट कोहली याने 44 चेंडूत 72 धावांची दमदार खेळी केली होती. मात्र टीम इंडियाच्या पदरी निराशा पडली होती. त्यानंतर 2016 मध्येही वेस्ट इंडिज आणि टीम इंडियाचा सेमी फायनल सामना झालेला. तेव्हा विराटने 47 चेंडूत 89 धावांची खेळी केल होती. मात्र त्या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला होता. तिसरा म्हणजे 2022 साली इंग्लंडविरूद्ध झालेल्या सेमी फायनलमध्येही विराटने 50 धावा केल्या होत्या आणि टीम इंडियाचा पराभव झाल होता.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली याने एकही अर्धशतकी खेळी केलेली नाही. विराटने आजच्या सामन्यात मोठी खेळी तर टीम इंडियाला फायदा होऊ शकतो. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने एकही सामना गमवलेला नाही. टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सामना संध्याकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. तर 7.30 वाजता सामन्याचा टॉस होणार आहे. आजच्या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीकडून सर्वांनाच अपेक्षा आहे. कोहली आज कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.