टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये दुसरा सेमी फायनल सामना सुरू आहे. हा सामना गयानामध्ये असून इंग्लंड संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाची सुरूवात एकदम खराब झाल्याचं पाहायला मिळालं. टीम इंडियाचा दोन बडे खेळाडी स्वस्तात परतले. त्यामुळे आता टीम इंडियावर दबाव असून इंग्लंड संघ एक पाऊल पुढे आहे. संपर्ण स्पर्धेत विराट कोहली अपयशी ठरलाय. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये त्याच्याकडून अपेक्षा होत्या. मात्र विराट कोहली परत एकदा लवकर आऊट झाला. कोहलीसुद्धा नाराज झाला होता, कोहली डगआऊटमध्ये बसल्यावर त्याच्याकडे हेड कोच राहुल द्रविड गेल्याचं पाहायला मिळालं.
विराट कोहलीने 9 बॉलमध्ये 9 धावा केल्या, यामध्ये त्याने एक खणखणीत षटकार मारला. पण त्यानंतर मोठा फटका खेळण्याच्या नादात तो बोल्ड आऊट झाला. रीस टोपलेने कोहलीला आऊट करत टीम इंडियाला पहिला धक्का दिला. कोहली शांत दिसत असला तरीपण त्याच्यावर किती दबाव असेल हे काही सांगण्याची गरज नाही. एकटा मैदानात थांबून विरोधकांना रडवणारा कोहली धावा करताना संघर्ष करताना दिसत आहे.
Rahul dravid went to Virat as he was looking broken after that dismissal, can’t see him like this man 💔 #INDvsENG pic.twitter.com/X0nPoSdF5s
— a v i (@973Kohli) June 27, 2024
आजच्या सेमी फायनलमध्ये कोहली खेळणार असं सर्वांना वाटत होतं. कोहलीने सुरूवातही केली होती पण आजही तो यशस्वी झाला नाही. कोहली डगआऊटमध्ये बसलेला, त्याच्यासोबत रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह बसलेले दिसले. त्यावेळी टीमचे मुख्य कोच राहुल द्रविड यांनी त्याच्याजवळ जात त्याचा आत्मविश्वास वाढवला. टीमचा कोच जवळ येत आपल्या पाठिमागे उभा राहत असेल तर खेळाडूवरचा दबाव हा नक्कीच कमी होतो. जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये कोहलीचा समावेश होतो त्यामुळे त्याला स्वत:लाही वाईट वाटत असणार यात काही शंक नाही.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर/कर्णधार), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपले.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.