IND vs SA Final: भारत दक्षिण अफ्रिका अंतिम सामन्यावरही पावसाचं सावट, जर पाऊस पडला तर काय? जाणून घ्या

| Updated on: Jun 28, 2024 | 3:30 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना आता शिल्लक राहिला आहे. भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. 29 जूनला बारबाडोसमध्ये अंतिम फेरीचा सामना खेळला जाईल. मात्र या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे या सामन्याचं गणित कसं असेल? याबाबत जाणून घेऊयात

IND vs SA Final: भारत दक्षिण अफ्रिका अंतिम सामन्यावरही पावसाचं सावट, जर पाऊस पडला तर काय? जाणून घ्या
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील जेतेपदाचा निकाल आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. 29 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात लढतीला सुरुवात होणार आहे. पण या सामन्यावरही पावसाचं सावट असल्याने भारतीय क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. रिपोर्टनुसार या सामन्यात 70 ते 80 टक्के पाऊस पडेल असा अंदाज आहे. त्यामुळे या सामन्यात पावसामुळे वारंवार खंड पडू शकतो. उपांत्य फेरीत याचा अंदाज आला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे क्रीडाप्रेमींच्या उत्साहावर विरजन पडू शकते. इतकंच काय तर राखीव दिवशीही पाऊस पडेल असा अंदाजा आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल कसा लागेल. पाऊस पडला तर किती षटकांचा खेळ होईल इथपासून निकालापर्यंत सर्व काही सविस्तरपणे जाणून घ्या.

  • भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 29 जूनला अंतिम फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना झाला नाही तर 30 जूनला हा सामना होईल.
  • पावसाच्या व्यत्ययात निकाल देण्यासाठी दोन्ही संघांनी कमीत कमी 10 षटकं खेळणं गरजेचं आहे. जर दहा षटकांचा सामना झाला नाही तर हा सामना राखीव दिवशी खेळवला जाईल.
  • अंतिम सामन्यासाठी अतिरिक्त वेळ दिला गेला आहे. एकूण 3 तास 10 मिनिटांचा अतिरिक्त अवधी असेल. जर या अतिरिक्त वेळेत सामना पूर्ण झाला नाही तर मात्र राखीव दिवशी खेळवला जाईल.
  • सामना ठरलेल्या दिवशी म्हणजेच 29 जूनला करण्याचा मानस आहे. मग 10-10 षटकांचा सामना करण्याचा प्रयत्न असेल. पण तरीही पावसामुळे हा सामना झालाच नाही, तर मग राखीव दिवसाचा वापर केला जाईल.
  • पावसामुळे षटकं कमी केली गेली आणि पुन्हा पावसाच्या व्यत्ययामुळे सामना झाला नाही तर मग राखीव दिवशी जिथे सामना थांबला तेथून सुरुवात होईल.
  • एका संघाने 9 षटकं खेळली आणि पाऊस आला तर 17-17 षटकांचा सामना होईल. पण तेव्हा एकही चेंडू टाकला गेला नाही, तर मात्र दुसऱ्या दिवशी नव्याने सामना सुरु होईल. म्हणजेच 20 षटकांचा खेळ असेल. राखीव दिवशी पाऊस पडला तर षटकं कमी केली जातील.
  • दुसरं, ठरलेल्या दिवशी एक संघ 9 षटकं खेळला असेल आणि पावसामुळे 17 षटकांचा खेळ केला असेल. पाऊस थांबल्यानंतर एक जरी षटक टाकलं गेलं आणि खेळ थांबवण्याची वेळ आली, तर मात्र खेळ जिथे थांबला आहे तेथून राखीव दिवशी सुरु होईल.