टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली. आता टीम इंडियाचा 2 वर्षानंतर पुन्हा एकदा सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध सामना होणार आहे. इंडिया इंग्लंड यांच्यात 2022 साली टी 20 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये आमनासामना झाला होता. तेव्हा इंग्लंडने भारताला 10 विकेट्सने पराभूत केलं होतं. त्यामुळे आता कोण जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या सामन्यानिमित्ताने उभयसंघांची एकमेकांविरुद्ध असलेली आकडेवारी जाणून घेऊयात.
टी20 आय क्रिकेटमध्ये टीम इंडिया-इंग्लंड यांच्यात एकूण 23 वेळा आमनासामना झाला आहे. या 23 पैकी सर्वाधिक सामन्यात टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ राहिली आहे. टीम इंडियाने 23 पैकी 12 सामन्यात विजय मिळवला आहे. तर इंग्लंडला 12 सामन्यात यश मिळवता आलं आहे. याआधी दोन्ही संघ टी 20 वर्ल्ड कप 2022 सेमी फायनलमध्ये भिडले होते. तेव्हा इंग्लंडने कॅप्टन जोस बटलरच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर टीम इंडिया विरुद्ध 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला होता. उभसंघात टी 20 वर्ल्ड कपमध्ये 4 सामने झाले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकलेत.
दरम्यान टीम इंडिया-इंग्लंड सेमी फायनल सामन्याला 27 जून रोजी रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेत अद्याप अजिंक्य आहे. टीम इंडियाने एकूण आणि सलग 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता सेमी फायनलमध्ये विजय मिळवून इंग्लंडच्या गेल्या पराभवाचा वचपा घेण्याची दुहेरी संधी टीम इंडियाकडे आहे.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
B जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिलिप सॉल्ट, रीस टोपले आणि मार्क वुड.