PAK vs IRE Toss: पाकिस्तानने आयर्लंड विरुद्ध टॉस जिंकला, Playing 11 मध्ये कोण?

| Updated on: Jun 16, 2024 | 8:03 PM

Pakistan vs Ireland Toss: पाकिस्तान आणि आयर्लंड या दोन्ही संघांचा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील अखेरचा सामना आहे.

PAK vs IRE Toss: पाकिस्तानने आयर्लंड विरुद्ध टॉस जिंकला, Playing 11 मध्ये कोण?
pak vs ire
Image Credit source: Pakistan Cricket X Account
Follow us on

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 36 व्या सामन्यात ए ग्रुपमधील पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील चौथा आणि अखेरचा सामना आहे. या सामन्याचं आयोजन हे सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे करण्यात आलं आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. पाकिस्तानने टॉस जिंकला. कॅप्टन बाबर आझम याने फिल्डिंगचा निर्णय घेत आयर्लंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दोन्ही संघ संघांचं आव्हान संपुष्टात आलंय. मात्र या अखेरच्या सामन्यात विजय मिळवून मोहिमेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांचा असणार आहे.

पाकिस्तान आणि आयर्लंड या दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 1-1 बदल केला आहे. आयर्लंडने बेंजामिन व्हाईट याला क्रेग यंग याच्या जागी संधी दिली आहे. तर पाकिस्तानने अब्बास अफ्रिदी याचा समावेश केला आहे. तर वेगवान गोलंदाज नसीम शाह याला बाहरेचा रस्ता दाखवण्यात आला आहे. दोन्ही संघांचा हा शेवटचा सामना असल्याने जिंकून मायदेशी परतण्याचा प्रयत्न असणार आहे. आता या प्रयत्नात कोण यशस्वी ठरणार,याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.

पाकिस्तानने 3 पैकी फक्त 1 सामानच जिंकला आहे. तर आयर्लंडचं खातं अजूनही रिकाम आहे. आयर्लंडला 2 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. तर एक सामना हा पावसामुळे रद्द झाला. यूएसए विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द झाला.  त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. हा सामना 14 जून रोजी आयोजित करण्यात आला होता.

पाकिस्तानने आयर्लंड विरुद्ध टॉस जिंकला

आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन: पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सॅम अयुब, फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, अब्बास आफ्रिदी, हरिस रौफ आणि मोहम्मद अमीर.