Babar Azam: स्पर्धेतून बाहेर होणं जिव्हारी, बाबरने सांगितलं पराभवासाठी कारणीभूत कोण? म्हणाला…

| Updated on: Jun 17, 2024 | 1:58 AM

Pakistan Babar Azam: पाकिस्तान क्रिकेट टीमने सुपर 8 साठी क्वालिफाय न करणं हे कॅप्टन बाबर आझमच्या चांगलंच जिव्हारी लागलंय. बाबरने स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर काय म्हटलं?

Babar Azam: स्पर्धेतून बाहेर होणं जिव्हारी, बाबरने सांगितलं पराभवासाठी कारणीभूत कोण? म्हणाला...
babar azam press conference
Follow us on

गत उपविजेत्या पाकिस्तान क्रिकेट टीमची आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील कामगिरी त्यांच्या लौकीकाला साजेशी अशी राहिली नाही. पाकिस्तानचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. पाकिस्तानने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात आयर्लंड विरुद्ध धडपडत विजय मिळवला. आयर्लंडने विजयासाठी 107 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानने ते आव्हान 7 विकेट्स गमावून कसंतरी पूर्ण केलं. पाकिस्तानचा हा 4 सामन्यांमधील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरला. मात्र पाकिस्तानचं आव्हान हे आधीच संपुष्टात आलंय. याचं दुख बाबरने व्यक्त केलं.

बाबरने पराभवासाठी कुणाला जबाबदार ठरवलं?

आयर्लंड विरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान टीमला मायदेशी परतावं लागणार आहे. कारण यूएसए आणि टीम इंडिया विरुद्ध झालेला पराभव आणि यूएसए-आयर्लंड यांच्यातील रद्द झालेला सामना हा आमच्या घरी जाण्याचं मख्य कारण ठरलं. बाबरला शेवटच्या सामन्यातील विजयानंतर 2 पराभवांची आठवण झाली. त्यानंतर बाबरने फलंदाजांना आरोपी ठरवलं.

आम्ही चांगल्या पद्धतीने संपवलं मात्र सातत्याने विकेट्स गमावल्या. माझ्या हिशोबाने आम्ही चांगली गोलंदाजी केली. मात्र बॅटिंगदरम्यान सातत्याने विकेट्स गमावणं निराशाजनक होतं. इथल्या परिस्थितीचा आमच्या गोलंदाजांनी चांगला फायदा करुन घेतला. पण यूएसएमध्ये आम्ही चूक केली आणि विकेट्स गमावता तेव्हा दबाव वाढतो. टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यातही तेच झालं. आता आम्हाला घरी जावं लागेल. आम्ही कुठे कमी पडलो यावर चर्चा करु. आम्ही टीम म्हणून चांगली टीम नाही”, असं बाबरने म्हटलं.

4 सामने 2 विजय

पाकिस्तानने या स्पर्धेतील 4 पैकी 2 सामने जिंकले. तर 2 सामन्यात अपयश आलं. पाकिस्तानची सुरुवातच पराभवाने झाली. पाकिस्तानला नवख्या यूएसएने सुपर ओव्हरमध्ये पराभूत व्हावं केलं. दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारताने 6 धावांनी मात केली. त्यानंतर पाकिस्तानने कॅनडा आणि आयर्लंडवर कुरघोडी करत यश मिळवलं.

आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन: पॉल स्टर्लिंग (कॅप्टन), अँड्र्यू बालबर्नी, लॉर्कन टकर (विकेटकीपर), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल आणि बेंजामिन व्हाइट.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सॅम अयुब, फखर जमान, उस्मान खान, शादाब खान, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, अब्बास आफ्रिदी, हरिस रौफ आणि मोहम्मद अमीर.