यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया अपराजित राहिलेली आहे. कॅप्टन रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया कमाल कामगिरी करत आहे. आतारपर्यंत एकही सामना भारताने गमावलेला नाही. टीम इंडियाचा उद्या म्हणजेच 26 जूनला इंग्लंड संघासोबत सामना होणार आहे. या सामन्यात जो संघ विजय मिळवेल तो थेट फायनलमध्ये जाणार आहे. दोन्ही संघांन दमदार तयारी केली असल्याने कोणती टीम विजयश्री मिळवते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच इंग्लंडच्या माजी खेळाडूने मोठं विधान केलं आहे.
माजी अष्टपैलू खेळाडू पॉल कॉलिंगवूडने मोठं विधान केलं आहे. टी-20च्या विश्व कप सेमी फायनलमध्ये फॉर्मात असलेल्या टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी इंग्लंडला असामान्य कामगिरी करावी लागेल, असं कॉलिंगवूडने म्हटलंय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पराभूत होण्याची शक्यता कमी असल्याचं पॉल कॉलिंगवूडला वाटतंय. मला भारताला पराभूत होताना पाहायचं नाहीये, असं त्याने म्हटलंय. गुरुवारी भारत आणि इंग्लंड दरम्यान सेमी फायनल होणार आहे.
टीम इंडियाकडे जसप्रीत बुमराह असल्याने संघ आणखी बळकट झालाय. बुमराहच्या बॉलिंग आक्रमणाला उत्तर देण्याची तयारी कोणत्याही टीमकडे नाही. 120 मधील बुमराहचे 24 चेंडू सामना पालटवू शकतात. अमिरेकेसारख्या स्लो खेळपट्ट्यांवर टीम इंडियाने दमदार कामगिरी केली. रोहित शर्मासारखा आक्रमक फलंदाज फॉर्मममध्ये आल्याचं पॉल कॉलिंगवूडने म्हटलं आहे.
दरम्यान, टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्ड करमध्ये आयर्लंड, अमेरिका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. कॅनडाविरूद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता सेमी फायनलमध्ये तुल्यबळ इंग्लंड संघाचं आव्हान समोर असल्याने टीम इंडियाला पूर्ण ताकद लावावी लागणार आहे. टीम इंडियाचा स्टाक खेळाडू विराट कोहली अद्याप फॉर्ममध्ये आला नाही. कोहली फॉर्ममध्ये आला तर टीम इंडियाला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. रोहित शर्मा, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या यांनी आतापर्यंत फलंदाजीची जबाबदारी सांभाळली आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिस्टर .
इंग्लंड संघ : जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जोनाथन बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपले, मार्क वुड .