टी-20 वर्ल्ड कप 2024 फायनलच्या श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने आफ्रिकेवर 7 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या शिलेदारांनी आयसीसी ट्रॉफीचा 13 वर्षांचा दुष्काळ संपवला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण टीमने दमदार कामगिरी केली. सामना टीम इंडियाच्या हातातून गेला होता. चतुर कॅप्टन रोहितने गोलंदाजांना योग्य प्रकारे वापर करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. टीम इंडियाने वर्ल्ड जिंकल्यावर मैदानात रोहित शर्मा आणि किंग विराट कोहली यांनी एकमेकांना मिठी मारली, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टीम इंडियासाठी रोहित शर्माने आतापर्यंत नऊ तर विराट कोहलीने सहा वर्ल्ड कप खेळले आहेत. दोघांसाठी मोठा कालावधी होता परंतु शेवटपर्यंत त्यांनी हार मानली नाही. टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक आयसीसी ट्रॉफी नसल्याने त्यांच्या रेकॉर्डवर पाणी फेरल्यासारखं होतं. आता ही कमी भरून निघली आहे. टी-२० चा पहिला वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकला त्या संघाचा रोहित शर्मा भाग होता. तेव्हापासून रोहित खेळला खरा पण टीम इंडिया एकदाही ट्रॉफी जिंकू शकली नव्हती. विराट, रोहित, बुमराहसारखे मोठे खेळाडू असूनही आयसीसी ट्रॉफी जिंकत आली नाही यावरून टीम इंडियाला हिणवलं जायचं. मात्र आता टी-२० वर्ल्ड कप जिंकल्याने टीकाकारांच्या तोंडाला कुलुप लागणार आहे.
पाहा व्हिडीओ:
Player of The Match – Virat Kohli
Last T20 Game For king kohli…Greatest Player to Play t20 Game😭#ViratKohli #T20WorldCup2024
pic.twitter.com/cF5pAAplkw— Sanskari (@sanskari_SM0) June 29, 2024
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नॉर्खिया नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह