T20 World Cup : रोहित शर्माने रविंद्र जडेजाला डावललं? आकाश चोप्राने उपस्थित केला प्रश्न

| Updated on: Jun 13, 2024 | 8:28 PM

टी20 वर्ल्डकपच्या तीन सामन्यात रवींद्र जडेजाची कामगिरी अजूनही हवी तशी झालेली नाही. त्यामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. दुसरीकडे, अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाला डावलल्याची चर्चाही जोर धरू लागली आहे. अशात माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राने प्रश्न उपस्थित केला आहे.

T20 World Cup : रोहित शर्माने रविंद्र जडेजाला डावललं? आकाश चोप्राने उपस्थित केला प्रश्न
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून भारतीय संघाला आयसीसी चषकांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. असं असताना सर्वच खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. असं असताना रवींद्र जडेजाची कामगिरी चर्चेचा विषय ठरला आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा अजूनही हवी तशी कामगिरी करू शकलेला नाही. भारताने सुरुवातीचे तीन सामने जिंकले खरे पण त्यात जडेजाचं योगदान फारसं राहिलेलं नाही. अशात भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या मते, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने खराब कामगिरीमुळे रवींद्र जडेजावर अविश्वास दाखवला आहे. कर्णधार रोहित शर्माने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाला एकही षटक सोपवलं नाही. चोप्राने हीच री ओढत सांगितलं की, ‘अमेरिकेच्या चांगल्या फलंदाजीविरुद्ध जडेजा षटक न देणं आत्मविश्वासाची उणीव दाखवत आहे.’

आकाश चोप्राने यूट्यूब व्हिडीओवर सांगितलं की, “सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, रवींद्र जडेजासोबत काय केलं जात आहे? कर्णधाराने रवींद्र जडेजाला एकही षटक सोपवलं नाही. शिवम दुबेला षटक सोपवलं. पण तो महागात पडला आणि या स्तरावर गोलंदाजीसाठी तयार नसल्याचं दिसून आलं. इतकंच काय तर जडेजाला एकही षटक दिलं नाही. तसेच फलंदाजीला वरही पाठवलं नाही. असं वाटते की जडेजावरीव आत्मविश्वास अचानक कमी झाला आहे. त्याला काही धावा आणि विकेट घेणं गरजेचं आहे. कारण ही स्पर्धा त्याच्यासाठी चांगली गेलेली नाही.”

अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात डावखुऱ्या रवींद्र जडेजाला फलंदाजीसाठी वर पाठवलं जाईल अशी आशा क्रीडाप्रेमींना होती. पण सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी विजय मिळवून दिला. रवींद्र जडेजाने आतापर्यंतच्या तीन सामन्यात फक्त तीन षटकं टाकली आहेत. न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना तशी जास्त काही मदत होत नव्हती म्हणून वेगवान गोलंदाजांना प्राधान्य मिळालं. आता पुढच्या सामन्यात रोहित शर्मा रवींद्र जडेजाचा कसा उपयोग करतो? तसेच रवीद्र जडेजाच्या कामगिरी क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून असेल.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.