आयपीएल स्पर्धेसाठीचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. या स्पर्धेसाठी 20 संघ सज्ज झाले असून 15 खेळाडूंच्या नावांची घोषणाही झाली आहे. 1 जूनपासून या स्पर्धेला अमेरिकेत सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे. याच दिवशी दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. पाच संघांचे चार गट तयार केले असून यातील टॉप दोन संघ सुपर 8 फेरीत खेळतील. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तर उपांत्य फेरीचा सामना 26 जून आणि 27 जूनला होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना 29 जूनला होणार आहे. असं सर्व वेळापत्रक सर्वश्रूत असताना आयसीसीच्या एका निर्णयाने खळबळ उडाली आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, टी20 वर्ल्डकपसाठीच्या दुसऱ्या सेमीफायनलचा सामना चार तासांऐवजी 8 तासांचा असेल.
दुसऱ्या सेमीफायनलची वेळ चार तासांनी वाढवण्यात आली आहे. म्हणजेच दुसऱ्या सेमीफायनलसाठी दिवस राखीव नाही. याचा अर्थ असा की ज्या दिवशी हा सामना आहे त्याच दिवशी पूर्ण केला जाईल. कारण दुसरा उपांत्य फेरीचा सामना संपल्यानंतर लगेचच 29 जूनला अंतिम सामना होणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीचा सामना 26 जूनला त्रिनिदाद येथे खेळवला जाईल. या सामन्यात पाऊस पडला तर एक दिवस राखीव आहे. म्हणजेच पावसाचं विघ्न पडलं तर हा सामना 27 जूनला होईल.
दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना 27 जूनला गयाना येथे होणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. म्हणजेच हा सामना त्याच दिवशी संपवण्याची योजना आहे. त्यासाठई आयसीसीने सामन्याची वेळ चार तासांनी वाढवली आहे. म्हणजे पावसाचं विघ्न आलं तर आणखी 4 चार तासांचा अवधी दिला जाईल. यासाठी राखीव दिवसाची गरज नसल्याचं आयसीसीचं म्हणणं आहे.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (वीसी), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज राखीव खेळाडू: शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान