टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना अवघ्या काही तासात सुरु होईल. अमेरिका आणि कॅनडा यांच्यात पहिला सामना होणार आहे. असं असताना सर्वांना वेध लागले आहेत ते 9 जूनला होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याचे..कारण पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत पाकिस्तान सामना पाहण्यासाठी कोट्यवधी क्रीडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या स्पर्धेतील सर्वात हायव्होल्टेज सामना म्हणून याकडे पाहिलं जात आहे. त्यामुळे हा सामना प्रत्यक्ष पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडेल अशी अपेक्षा आहे. पण हा अंदाज काही अंशी फोल ठरला तर आश्चर्य वाटायला नको. कारण भारत पाकिस्तान सामन्याची तिकीट विक्री पूर्णपणे झालेली नाही. आयसीसी वेबसाईटवर अजूनही तिकीटे उपलब्ध आहेत. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. एकीकडे हायव्होल्टेज सामना असताना आणि दोन्ही संघांचा मोठा फॅनबेस असताना अजूनही तिकीट विक्री न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आतापर्यंत भारत पाकिस्तान सामन्याची तिकीट विक्री सुरु झाली की काही तासातच हाऊसफूल होते. पण यावेळेस चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळत आहे. तिकीट विक्री न झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. पण याचं प्रमुख कारण म्हणजे गरजेपेक्षा जास्त महाग आहेत. आयसीसीने तीन टप्प्यात तिकीट विक्री ठेवली आहे. यात डायमंड क्लब, प्रीमियम कल्ब लाउंज आणि कॉर्नर क्लब यांचा समावेश आहे.
डायमंड क्लब तिकिटाची विक्री करणाऱ्या चाहत्यांना मैदानात चांगली सुविधा मिळेल. पण यासाठी चाहत्यांना एका तिकिटासाठी 8.34 लाख रुपये मोजावे लागतील. प्रीमियम क्लब लाउंजच्या तिकिटाची रक्कम ही 2 लाख रुपये, कॉर्नर क्लबची तिकिटाची किंमत 2029 लाख रुपये आहे. भारत पाकिस्तान सामना असल्याने वाटेल ती किंमत चाहते मोजतील असं आयसीसीला वाटलं होतं. पण भलतंच काहीतरी घडलं आहे. महागडं तिकीट पाहून अनेकांनी पाठ फिरवलं आहे. त्यामुळे आयसीसी तिकिटांचे दर कमी करते का? की सामन्यात रिकाम्या जागांचं दर्शन घडेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
भारतीय टीम: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराटकोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान.
पाकिस्तान टीम: बाबर आजम (कर्णधार), अबरार अहमद, आजम खान, फखर जमां, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सैम अयूब, शादाब खान, शाहीन शाह आफरीदी आणि उस्मान खान.