T20 World Cup : श्रीलंकन टीमला फ्लोरिडात बसला पुराचा फटका, संपूर्ण संघ आयसीसीवर नाराज

| Updated on: Jun 13, 2024 | 9:42 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत श्रीलंकन संघाची कामगिरी चॅम्पियन संघासारखी दिसली नाही. या स्पर्धेत श्रीलंकेला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. दक्षिण आफ्रिकेनंतर बांगलादेशने पराभूत केलं आणि तिसरा पावसामुळे वाया गेला. अशा संकटात असताना आता श्रीलंकन संघ पुरात अडकला आहे.

T20 World Cup : श्रीलंकन टीमला फ्लोरिडात बसला पुराचा फटका, संपूर्ण संघ आयसीसीवर नाराज
Image Credit source: Twitter
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या ड गटात दक्षिण अफ्रिका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ आणि श्रीलंका हे संघ आहेत. या गटातून दक्षिण अफ्रिकेने सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. तर दुसऱ्या संघाचं अजून काही ठरलेलं नाही. असं असलं तरी श्रीलंकन संघाचं सुपर 8 फेरीत स्थान मिळवणं खूपच कठीण आहे. श्रीलंकेचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. श्रीलंकन संघाला पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेने पराभूत केलं. त्यानंतर बांगलादेशनेही पराभवाची धूळ चारली. तर नेपाळ विरुद्धच्या सामन्यात 2 गुण मिळतील अशी आशा असताना पावसाने वाट लावली. त्यामुळे तीन सामन्यातून फक्त एका गुणावर समाधान मानावं लागलं आहे. असं असताना ज्या काही थोड्या फार आशा टिकल्या आहेत त्या चौथ्या सामन्यावर आहे. मात्र तिथेही श्रीलंकन संघ अडचणीत आला आहे. श्रीलंकन संघ फ्लोरिडाच्या पुरात अडकला आहे.

श्रीलंकन मीडिया रिपोर्टनुसार, फ्लोरिडातील पूरस्थितीमुळे श्रीलंकन संघ तिथेच अडकला आहे. नेदरलँड विरुद्धच्या सामन्यासाठी श्रीलंकेला फ्लोरिडातून सेंट लूसियाला बुधवारी जायचं होतं. पण पूरस्थितीमुळे फ्लाइट रद्द करण्यात आली आहे. फ्लोरिडात आपातकालीन घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे संघाचा पुढचा प्रवास कसा होणार हे कळलेलं नाही. श्रीलंकेचा पुढचा सामना 17 जूनला सेंट लूसिया खेळला जाणार आहे. श्रीलंकेला हा सामना काहीही करून जिंकायचा आहे. असं असताना पूरस्थितीमुळे पुढचं गणित बिघडू शकतं. आता श्रीलंकन संघ शुक्रवारी सेंट लूसियाला पोहोचेल असं सांगण्यात येत आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील नियोजनावर यापूर्वीच श्रीलंक संघाने नाराजी व्यक्त केली आहे. खेळाडूंना सर्वाधिक प्रवास करायला लावल्याचा आरोपही केली आहे. इतकंच काय तर मैदान हॉटेलपासून दूर असल्याचं सांगत सकाळी लवकर उठायला लागत असल्याचंही सांगितलं आहे. त्यामुळे शारीरिक थकवा जाणवत असल्याचं खेळाडूंचं म्हणणं आहे.

श्रीलंकेचा संघ: पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, धनंजया डी सिल्वा, चरिथ असालंका, वानिंदू हसरंगा(कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, महेश थेकशाना, मथीशा पाथिराना, नुवान थुशारा, दुष्मनाल, दुष्मनी, दुष्मना, वेल सदीरा समरविक्रमा, दिलशान मधुशंका