Eng vs SA Super 8: इंग्लंड दक्षिण आफ्रिकेची विजयी घोडदौड रोखणार का? सेमी फायनलमध्ये कोण मारणार धडक?

| Updated on: Jun 21, 2024 | 6:15 PM

England vs South Africa Super 8: दक्षिण आफ्रिका या स्पर्धेत अद्याप अजिंक्य आहे. तसेच इंग्लंडनेही सुपर 8 मध्ये विजयी सुरुवात केली आहे. त्यामुळे आता इंग्लंडसमोर दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचं आव्हान आहे.

Eng vs SA Super 8: इंग्लंड दक्षिण आफ्रिकेची विजयी घोडदौड रोखणार का? सेमी फायनलमध्ये कोण मारणार धडक?
england vs south africa
Follow us on

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 45 व्या सामन्यात सुपर 8 फेरीत ग्रुप 2 मधील गतविजेता इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांचा हा सुपर 8 मधील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांनी आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दोघांना या सामन्यात विजय मिळवून सेमी फायनलचं तिकीट निश्चित करण्याची सुवर्ण संधी आहे. त्यामुळे उभयसंघात या सामन्यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळू शकते.

इंग्लंडने जोस बटलर याच्या नेतृत्वात 20 जून रोजी वेस्ट इंडिजवर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला. तर सुपर 8 मधील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यूनायटेड स्टेट्‍स विरुद्ध 18 धावांनी मात केली.अशाप्रकारे यूएसए आणि इंग्लंड दोन्ही संघांनी 2 गुण मिळवले. आता इंग्लंड-दक्षिण आफ्रिकेत सुपर 8 मधील दुसरा विजय मिळवून सेमी फायनलमधील स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना सेमी फायनलमध्ये पोहचणारा पहिला संघ कोण? याची उत्सुकता लागली आहे.

दोन्ही संघाची साखळी फेरीतील कामगिरी

इंग्लंडने साखळी फेरीतील 4 पैकी 2 सामने जिंकले. तर 1 सामना पावसामुळे रद्द झाला. तर एका सामन्यात पराभूत व्हावं लागलं. तर दक्षिण आफ्रिका अद्याप अजिंक्य आहे. दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकेल आहेत. त्यामुळे इंग्लंड दक्षिण आफ्रिकेची विजयी घोडदौड रोखणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

इंग्लंड क्रिकेट टीम: जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड, रीस टोपले, बेन डकेट, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन आणि टॉम हार्टले.

दक्षिण आफ्रिका टीम : एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी, रायन रिकेल्टन, ओटनील बार्टमन, ब्योर्न फॉरेन आणि जेराल्ड कोएत्झी.