टीम इंडियाने बुधवारी 12 जून रोजी यूएसएवर विजय मिळवत सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला. टीम इंडिया सुपर 8 मध्ये ए ग्रुपमधून पोहचणारी पहिली आणि एकूण तिसरी टीम ठरली. टीम इंडियाने साखळी फेरीतील 4 पैकी पहिले 3 सामने सलग जिंकले. टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि यूएसएचा पराभव केला. आता टीम इंडियाचा चौथा आणि अखेरचा सामना हा 15 जून रोजी कॅनडा विरुद्ध असणार आहे. त्यानंतर टीम इंडिया सुपर 8 साठी सज्ज होणार आहे. आपण टीम इंडियाच्या सुपर 8 सामन्यांचं वेळापत्रक जाणून घेऊयात.
सुपर 8 साठी एकूण 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. त्यानुसार ए ग्रुपमधून टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी स्थान निश्चित केलंय. तर 2 संघ बाकी आहेत. तर बी ग्रुपमधून वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका सुपर 8 मध्ये पोहचले आहेत. तर आता 4 जागांसाठी चुरस आहे. टीम इंडिया सुपर 8 मध्ये एकूण 3 सामने खेळणार आहे. टीम इंडियासमोर या फेरीतील पहिल्या 2 सामन्यात प्रतिस्पर्धी कोण असणार हे अजून निश्चित झालेलं नाही. मात्र तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. तसेच टीम इंडियाच्या या तिन्ही सामन्यांना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तसेच तिन्ही सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत.
दरम्यान टीम इंडिया ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी विराजमान आहे. टीम इंडियासह या ग्रुपमध्ये पाकिस्तान, यूएसए, कॅनडा आणि आयर्लंड हे संघ आहेत. टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि यूएसए या 3 संघांना पराभूत केलंय. टीम इंडियानंतर यूएसए पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.
26 जून रोजी पहिला उपांत्य फेरीतील सामना हा त्रिनिदाद येथे होणार आहे. तर दुसरा सामना हा 27 जून रोजी गयाना येथे आयोजित करण्यात आला आहे. तसेच 29 जून महाअंतिम सामान पार पडेल.
विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 24 जून
विरुद्ध ग्रुप डी मधील दुसरा संघ, 22 जून
विरुद्ध ग्रुप सीमधील पहिला संघ, 20 जून
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.