USA vs PAK: यूएसएच्या सुपर ओव्हरमधील विजयामुळे टीम इंडियाला मोठा झटका

| Updated on: Jun 07, 2024 | 7:39 PM

USA vs PAK Super Over: यूएसएने पाकिस्तान क्रिकेट टीमवर टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. यूएसएच्या विजयामुळे टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे.

USA vs PAK: यूएसएच्या सुपर ओव्हरमधील विजयामुळे टीम इंडियाला मोठा झटका
Follow us on

क्रिकेट चाहत्यांना शुक्रवारी 7 जूनच्या मध्यरात्री टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. नवख्या यूएसए क्रिकेट टीमने पाकिस्तान विरुद्धच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. यूएसएचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. तर पाकिस्तानची वर्ल्ड कप मोहिमेतील सुरुवात पराभवाने झाली. यूएसएने या विजयासह सुपर 8 साठी दावा आणखी मजबूत केला आहे. तर यूएसएच्या या विजयामुळे टीम इंडियाला मोठा झटका लागला. यूएसएच्या या विजयामुळे टीम इंडियाला नक्की कसा झटका लागला? हे जाणून घेण्याआधी सामन्याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.

पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 160 धावांचा पाठलाग करताना यूएसएने 19 ओव्हरमध्ये 145 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 15 धावांची गरज होती. यूएसएच्या फलंदाजांनी सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आणला. यूएसएला विजयासाठी 6 धावांची गरज असताना नितीश कुमारने चौकार ठोकून सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर यूएसएने सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी दिलेल्या 19 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानला 13 धावाच करता आल्या. यूएसए अशाप्रकारे हा सामना 5 धावांनी जिंकली.

यूएसए नंबर 1

यूएसएने या विजयासह ए ग्रुपमध्ये टीम इंडियाला मागे टाकत पॉइंट्स टेबलमध्ये 4 गुणांसह पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. तर टीम इंडियाची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. यूएसएचा नेट रनरेट हा 0.63 इतका आहे. तर टीम इंडियाचा नेट रनरेट हा 1 विजयासह 3. 06 असा आहे. तर कॅनडा, आयर्लंड आणि पाकिस्तान या तिन्ही संघांच्या खात्यात ‘झिरो बॅलन्स’ आहे. सुपर 8 साठी प्रत्येक ग्रुपमधून 2 अव्वल संघ पात्र ठरणार आहेत. त्यामुळे टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी पुढील सामना हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे.

टीम इंडियाला पछाडत यूएसए अव्वलस्थानी विराजमान

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), उस्मान खान, फखर जमान, आझम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर आणि हरिस रौफ.

युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नॉथुश केंजिगे, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.