IND vs NZ : टी20 वर्ल्ड कप 2024 मधील टीम इंडियाचा पहिला सामना; कधी, कुठे आणि कसा पाहाल ते जाणून घ्या

| Updated on: Oct 03, 2024 | 7:23 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. भारताचा हा पहिलाच सामना असून न्यूझीलंडसारख्या तगड्या संघाचं आव्हान आहे. आता भारतीय संघ हे आव्हान पेलणार की नाही? याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये धाकधूक लागून आहे.

IND vs NZ : टी20 वर्ल्ड कप 2024 मधील टीम इंडियाचा पहिला सामना; कधी, कुठे आणि कसा पाहाल ते जाणून घ्या
Image Credit source: BCCI
Follow us on

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु झाली असून पहिल्याच सामन्यात बांगलादेशने स्कॉटलंडचा पराभव केला. बांगलादेशने स्कॉटलंडला 16 धावांनी पराभूत केलं. आता भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने येणार आहे. साखळी फेरीत एकूण चार सामने खेळायचे आहेत. त्यामुळे तीन सामन्यात काहीही करून विजय मिळायलाच हवा. अन्यथा उपांत्य फेरीचं गणित किचकट होईल. 4 ऑक्टोबरला भारता आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने येणार आहेत. भारताचं नेतृत्व हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर आहे. भारतीय विजयी सलामी देत स्पर्धेला सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. पण न्यूझीलंडचं आव्हान काही सोपं नसेल हे देखील तितकं खरं आहे. पण भारताने दुबईत खेळलेल्या दोन्ही सराव सामन्यात विजयी सलामी दिली आहे. पहिल्या सराव सामन्यात 2016 टी20 वर्ल्डकप विजेत्या वेस्ट इंडिजचा पराभव केला. तर पुढच्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा 28 धावांनी पराभव केला. त्यामुळे हीच विजयी घोडदौड साखळी फेरीत असावी अशी क्रीडाप्रेमींची इच्छा आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड वुमन्स टी20 वर्ल्डकप सामना कधी खेळला जाईल?

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना होणार आहे. शुक्रवार, 4 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना होईल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड वुमन्स टी20 वर्ल्डकप सामना कुठे खेळला जाईल?

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 सामना थेट कसा पाहायचा?

हा सामना तुम्ही टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकता. सामन्याचे थेट लाईव्ह स्ट्रिमिंग Disney+Hotstar वर उपलब्ध असेल. तुम्ही Disney + Hotstar वर हा सामना विनामूल्य पाहू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही सबस्क्रिप्शनची गरज भासणार नाही.

दोन्ही संघाचे खेळाडू

भारत : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, साजवान पाटील. .

न्यूझीलंड: सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, इझी गेज, मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, फ्रान जोनास, लेह कॅस्परेक, मेली केर, जेस केर, रोझमेरी मायर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रोवे, ली ताहुहू .