टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीसाठी महत्त्वाचे सामने, बांगलादेश की नेदरलँड! कोणाला तिकीट?

| Updated on: Jun 15, 2024 | 11:03 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील महत्त्वाचे सामने रविवारी होत आहेत. ड गटातून कोणता दुसरा संघ सुपर 8 फेरी गाठणार याची उत्सुकता लागून आहे. सुपर 8 फेरीसाठी दोन्ही संघांना संधी आहे. पण दोन्ही संघांचं एकमेकांवर अवलंबून आहे. चला जाणून घेऊयात दोन संघांनी कशी संधी मिळू शकते.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीसाठी महत्त्वाचे सामने, बांगलादेश की नेदरलँड! कोणाला तिकीट?
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील ड गटातून दक्षिण अफ्रिका संघाने सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. तर नेपाळ आणि श्रीलंका यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. दुसऱ्या संघासाठी बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यात चुरस आहे. तसं पाहिलं तर बांगलादेशला संधी आहे. मात्र काही उलटफुलटं झालं तर कोणाला संधी मिळेल सांगता येत नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 37वा सामना बांगलादेश आणि नेपाळमध्ये होत आहे. तर 38वा सामना श्रीलंका आणि नेदरलँड यांच्यात होत आहे. बांगलादेशने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर नेदरलँडने 3 पैकी 2 सामने गमावले असून एका सामन्यात विजय मिळवला आहे. नेदरलँडच्या खात्यात फक्त दोन गुण आहेत, पण सुपर 8 फेरीची संधी आहे.

बांगलादेशचा शेवटचा सामना नेपाळशी आहे. नेपाळने दक्षिण अफ्रिकेला मागच्या सामन्यात विजयासाठी चांगलंच झुंजवलं होतं. अवघ्या एका धावेने दक्षिण अफ्रिकनं संघ जिंकला होता. त्यामुळे बांगलादेशनं नेपाळला कमी लेखण्याची चूक करू नये. दुसरीकडे नेपाळने बांगलादेशला पराभूत केलं तर नेदरलँडला संधी मिळू शकते. पण यासाठी नेदरलँडने श्रीलंकेला पराभूत करणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्व काही जर तरवर अवलंबून आहे. आता या दोन्ही सामन्यात काय निकाल लागतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

नेदरलँड आणि श्रीलंकेचे खेळाडू

टी 20 वर्ल्ड कपसाठी नेदरलँड्स टीम : स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन), आर्यन दत्त, बास डी लीडे, डेनियल डोरम, फ्रेड क्लासेन, कायल क्लेन, लोगान वॅन बीक, मैक्स ओ’डोड, माइकल लेविट, पॉल वॅन मीकेरेन, साइब्रांड एंगेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, टिम प्रिंगल , विक्रम सिंह आणि वेस्ले बर्रेसी.

टी 20 वर्ल्ड कपसाठी श्रीलंका टीम : वानिंदू हसरंगा (कर्णधार), चारिथ असलंका (विकेटकीपर), कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदू मेंडिस, सदीरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षना, दुनीथ नुशमान वेललागेरा, दुनीथ नुशमान चॅलेरा, नुशमन चॅलेस, मथीशा पथीराना आणि दिलशान मदुशंका.