केपटाऊन : भारताचा कालच्या ऑस्ट्रेलियावुरूद्धच्या सेमी फायनलमध्ये पराभव झाला. भारताच्या फिल्डिंग आणि ढेपाळलेल्या बॅटींग ऑर्डरला धारेवर धरलं जात आहे. हे जरी खरं असलं तरी सामन्यातील एक अशी ओव्हर जिथे सर्व गेम फिरला. या ओव्हरमध्ये गेलेल्या 18 धावा भारतीय संघाला जास्त भारी पडल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करत होता. कारण ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाच्या गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या बॅटरने धुवायला सुरूवात केली. संपूर्ण पॉवरप्लेमध्ये भारताच्या गोलंदाजांना विकेट घेण्यात यश आलं नाही. पहिली विकेट भारताला आठव्या ओव्हरमध्ये मिळाली. राधा यादवने अलिसा हिलीला 25 धावांवर बाद केलं.
एलिसा हिली आणि बेथ मूनी या जोडीनं संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 52 धावांची आश्वासक भागीदारी केली. एलिसा हिली बाद झाल्यानंतर मूनी आणि मेग लॅनिंगनं डाव सावरला. दोघांची संघाची धावसंख्या 88 पर्यंत नेली. बेथ मूनी तंबूत 54 धावा करून परतली.
लॅनिंगनं आपली खेळी सुरुच ठेवली. तिसऱ्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी केली. गार्डनर बाद झाल्यानंतर मेग लॅनिंग आणि ग्रेस हॅरिस जोडी फार काही करू शकली नाही. हॅरीस शिखा पांडेच्या गोलंदाजीवर 7 धावा करून बाद झाली. त्यानंतर गोलंदाजांना मेग लॅनिंग आणि एलिसे पेरी ही जोडी फोडता आली नाही. शिखा पाडे (2), राधा यादव 1 आणि दीप्ती शर्मानं 1 गडी बाद केला. तर स्नेह राणाला एकही गडी बाद करता आला नाही.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या19 ओव्हर्समध्ये 154 धावा झाल्या होत्या. त्यावेळी अनुभवी रेणुका सिंहने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. मात्र शेवटच्या षटकात तिला जवळजवळ 18 धावा निघाल्या आणि टीम इंडियाला 173 पेक्षा जास्त धावांचं आव्हान मिळालं.
Australia Playing 11 : मेग लॅनिंग (कर्णधार),बेथ मूने, अलिसा हीली (विकेटकीपर), अशले गार्डनर, इलिस पेरी, तहिला मॅग्राथ, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वारेहम, जेस जोनस्सेन, मेगन स्कूट आणि डार्सी ब्राउन.
Team India Playing 11 : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटीया, स्नेह राणा, शिखा पांडे, राधा यादव आणि रेणूका सिंह.