T-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेचा पराभव करत इतिहास रचला. आयसीसी ट्रॉफीचा 11 वर्षांनी दुष्काळ भारताच्या शिलेदारांनी संपवला. वर्ल्ड कपची फायनलच्या थरार अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत श्वास रोखून ठेवणारा झाला. टीम इंडियाच्या 176-7 धावांचा पाठलाग करणाऱ्या आफ्रिका संघाला 20 ओव्हरमध्ये 169-8 धावाच करता आल्या. या विजयानंतर जगभरातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विट करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये टीम इंडियाच्या तीन खेळाडूंचं कौतुक केलं आहे.
शेवटच्या ओव्हरपर्यंतचा थरार, 13 वर्षांनंतर एक अभिमानास्पद क्षण, असं शरद पवार म्हणाले. त्यासोबतच त्यांनी कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली आणि सुर्यकुमार यांचं कौतुक केलं. त्यासोबतच सुर्यकुमारने अप्रतिम कॅच घेतल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. शेवटच्या ओव्हरमध्ये साऊथ आफ्रिका संघाला 16 धावांची गरज होती. त्यावेळी हार्दिक पंड्या ओव्हर टाकत होता तर आफ्रिकेचा डेव्हिड मिलर स्ट्राईकवर होता. पहिलाच बॉल मिलरने समोर टोलावला, सिक्स जाणार होता पण सुर्यकुमार यादवे चतुराईने तो कॅच घेत मिलरचा कॅच घेतला.
Last over Thriller ! Proud Moment after 13 long years of wait. Kudos to @ImRo45, @imVkohli, and what a catch by @surya_14kumar!
Congratulations @teamIndia— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 29, 2024
टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका सामन्याचा हा टर्निंग पॉईंट ठरला, कारण मिरलने असे अनेक सामने आपल्या एकट्याच्या दमावर जिंकून दिले आहेत. मिलर आऊट झाल्यावर टीम इंडियाच्या बाजूने सामना झुकला होता. कारण मैदानावर कागिसो रबाडा आणि नॉर्खिया नॉर्टजे होते. दोघांनाही काही लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नॉर्खिया नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.