टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात अफगाणिस्तानने चमकदार कामगिरी केली. दिग्गज संघांना लोळवून उपांत्य फेरी गाठली. मात्र उपांत्य फेरीत अफगाणिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आणि स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र गोलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर अफगाणिस्तानचा काही निभाव लागला नाही. संपूर्ण अवघ्या 56 धावांवर तंबूत परतला. दक्षिण अफ्रिकेने विजयासाठी दिलेलं 57 धावांचं आव्हान 8.5 षटकात एक गडी गमवून पूर्ण केलं. पण अवघ्या 56 धावांचं आव्हान देऊनही अफगाणिस्ताने दक्षिण अफ्रिकेला रोखण्याचा चांगला प्रयत्न केला. कारण ही धावसंख्या गाठण्यासाठी 53 चेंडूंचा सामना करावा लागला. इतकंच दुसऱ्याच षटकात फझलहक फारुकीने क्विंटन डी कॉकला त्रिफळाचीत केलं आणि हेतू स्पष्ट केला. अवघ्या पाच धावांवर असताना क्विंटन डी कॉकची विकेट पडली. तिसऱ्या षटकात आणखी संधी चालून आली होती पण राशीद खानची चूक नडली.
क्विंटन डी कॉक बाद झाल्यानंतर एडन मार्करम मैदानात उतरला होता. त्याला आपलं खातं खोलताना अडचण होत होती. नवीन उल हकचे तीन चेंडू निर्धाव गेल्यानंतर चौथ्या चेंडूवर मार्करम फसला. पण त्याला बाद घेण्यात अफगाणिस्तानच्या खेळाडूंना अपयश आलं. त्याच्या बॅटला कट लागल्याचा आवाज कर्णधार राशीद खानला आला. पण विकेटकीपर आणि गोलंदाज नवीन उल हक याबाबत संभ्रमात होते. त्यामुळे राशीद खानने डीआरएस घेतला नाही. मात्र जेव्हा हा शॉट तपासला गेला तेव्हा मार्करम बाद असल्याचं दिसून आलं. यावरून आता सोशल मीडियावर रान उठलं आहे. राशीद खानने डीआरएस घ्यायला हवा होता असं सोशल मीडियावरून सांगितलं जात आहे.
— Johnson (@Johnson427427) June 27, 2024
It was an edge an Afghanistan doesn’t take the review !! Rashid was interested in taking the DRS but rest of the team said No!! South Africa could have been 6-2 !! 👀👀#SAvAFG #T20WoldCup pic.twitter.com/6qWADbs5RX
— Bade Hoke Cricketer Banunga 💭💭 (@FirstLovCricket) June 27, 2024
GURBAZ pic.twitter.com/WYY4numpXl
— mon (@4sacinom) June 27, 2024
एडन मार्करम तेव्हा शून्यावर होता आणि संघाच्या फक्त 6 धावा झाल्या होत्या. जर ही विकेट मिळाली असती तर दक्षिण अफ्रिकेवर काही अंशी दबाव वाढला असता. कदाचित वेगळं चित्रही असू शकलं असतं. पण जीवदान मिळाल्यानंतर रीझा हेन्ड्रिक आणि एडन मार्करम यांनी फायदा उचलला. एडन मार्करमने 21 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने नाबाद 23 धावा केल्या. तर रीझा हेन्ड्रिक याने 25 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 29 धावा केल्या. दक्षिण अफ्रिकेने अंतिम फेरी गाठली असून आता भारत किंवा इंग्लंडशी सामना होईल. 29 जूनला अंतिम फेरीचा सामना होणार आहे.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.
अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, अजमतुल्ला उमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, करीम जनात, रशीद खान (कर्णधार), नांगेलिया खरोटे, नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.