Team India Super 8: टीम इंडियाचा सुपर 8 मधील पहिला सामना कुणाविरुद्ध?

| Updated on: Jun 16, 2024 | 1:15 AM

T20 World Cup 2024 Team India Super 8: टीम इंडियाचा साखळी फेरीतील चौथा आणि अखेरचा सामना हा पावसामुळे वाया गेल्यानंतर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे सुपर 8 लढतीकडे लागलं आहे.

Team India Super 8: टीम इंडियाचा सुपर 8 मधील पहिला सामना कुणाविरुद्ध?
team india
Image Credit source: BCCI
Follow us on

टीम इंडियाचा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेकील साखळी फेरीतील चौथा आणि अखेरचा कॅनडा विरुद्धचा सामना रद्द झाला. पावसाच्या पाण्यामुळे ओल्या झालेल्या खेळपट्टीमुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे टीम इंडियाची साखळी फेरीत विजयी चौकार लगावण्याची संधी हुकली. त्याआधी टीम इंडियाने सलग 3 सामने जिंकून सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला आहे. कॅनडा विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला सुपर 8 च्या हिशोबाने अनेक प्रयोग करण्याची संधी होती, कारण वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्यांवर इतर खेळाडूंचा सरावही झाला असता. साखळी फेरीतील सुरुवातीचे सामने हे यूएसएमध्ये पार पडले होते. मात्र सामना रद्द झाल्याने प्रयोगाची संधी हुकली.

आता क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाच्या सुपर 8 सामन्यांची प्रतिक्षा लागून आहे. सुपर 8 साठी एकूण 8 संघांना ए आणि बी अशा 2 गटात 4-4 नुसार विभागण्यात आलं आहे. त्यानुसार ए गटात टीम इंडियासह ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान हे 2 संघ आहेत. तर चौथा आणि अखेरचा संघ निश्चित व्हायचा आहे. टीम इंडियाचा सुपर 8 मधील सामना कोणत्या संघाविरुद्ध असेल, ते जाणून घेऊयात.

टीम इंडियासमोर अफगाणिस्तानचं आव्हान

अफगाणिस्तान विरुद्ध टीम इंडियाचा सुपर 8 मधील पहिला सामना होणार आहे. राशीद खानच्या नेतृत्वात अफगाणिस्तानने साखळी फेरीत धमाकेदार कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर अफगाणिस्तानचं तगडं आव्हान असणार आहे. हा सामना 20 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. सामन्याचं आयोजन हे बारबाडोस, किंग्सटन ओव्हल येथे करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

टी 20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान संघ: रशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, अझमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांगयाल खरोती, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक आणि हजरतुल्लाह झझाई.