मुंबई : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आशिया कप तोंडावर असताना कर्णधारपद सोडून आशिया कप स्पर्धेमधून बाहेर पडण्याचा निर्णय कर्णधाराने घेतला आहे. येत्या 30 ऑगस्टपासून 14 व्या आशिया कप स्पर्धेला सुरूवात होत आहे. टीम इंडियाचे आशिया कपमधील सर्व सामने श्राीलंकेमध्ये होणार आहेत. या स्पर्धेला अवघ्या एक महिन्याचा कालावधी बाकी असताना स्टार खेळाडूने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची क्रीडा वर्तुळात जोरदार चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे.
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार तमीम इक्बाल आहे. तमिम इक्बालने आता काही दिवसांपुर्वी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र बांगलादेशच्या राष्ट्ट्रपती शेख हसीना यांनी तमिमला निवृत्तीचा निर्णय मागे घ्यायला लावला होता. आता परत एकदा त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तमिम इक्बाल याच्या या निर्णयाची क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
तमिम इक्बाल याने पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती घेतली. डावखुरा फलंदाज असलेल्या तमिमने येत्या वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. व्यस्त शेड्यूलमुळे ताण येऊ नये म्हणून त्याने सावधानता म्हणून हा निर्णय घेतल्याची माहिती समजत आहे.
वर्ल्ड कपआधी बांगलादेश संघाची न्यूझीलंडविरूद्ध वन डे सामन्यांची मालिक आहे. तमिमने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की, एक कर्णधार म्हणून मला स्वत:वर लक्ष केंद्रित करायचं आहे. वर्ल्ड कपवेळी संधी मिळेल तेव्हा मला सर्वोत्तम कामगिरी करायची आहे.
? Major team news for Bangladesh ahead of Asia Cup 2023.
Details ⬇️https://t.co/43kXkv5AeT
— ICC (@ICC) August 4, 2023
दरम्यान, तमिम इक्बाल याने बांगलादेशकडून 70 कसोटी सामने, 241 वन डे आणि 78 टी-20 सामने खेळले पाहिजेत. यामधील कसोटीमध्ये 5134, वन डेमध्ये 8313 तर टी-20 मध्ये 1758 धावा केल्या आहेत. यामधील कसोटीत 10 शतके, वन डे मध्ये 14 शतके आणि 56 अर्धशतके आणि टी-20 मध्ये 1 शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.