IPL 2023 : भर मैदानात टाटा कंपनीचं दुसऱ्यांदा झालं नुकसान, द्यावे लागणार पाच लाख! काय केलं पाहा

| Updated on: May 09, 2023 | 11:28 PM

आयपीएल 2023 स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा वर्षाव होत आहे. षटकारांच्या आतषबाजीमुळे टाटा कंपनीला दुसऱ्यांदा फटका बसला आहे. ऋतुराजनंतर आता नेहल वढेराने तसंच काहीसं करत नुकसान केलं आहे.

IPL 2023 : भर मैदानात टाटा कंपनीचं दुसऱ्यांदा झालं नुकसान, द्यावे लागणार पाच लाख! काय केलं पाहा
IPL 2023 Video : मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामन्यात तसंच काहीसं झालं, आता टाटा कंपनीला द्यावे लागणार पाच लाख
Follow us on

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील प्लेऑफचं चित्र आता हळूहळू करून स्पष्ट होत आहे. सर्वच संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी जीवाचं रान करताना दिसत आहे. असंच काहीसं मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यात पाहायला मिळालं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 6 गडी गमवून 199 धावा केल्या आणि विजयासाठी 200 धावांचं आव्हान मुंबई पुढे ठेवलं. मुंबईला इशान किशनने चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेराने चांगली साथ दिली. मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. या सामन्यात वढेरा एक उत्तुंग षटकार मारला आणि टाटा कंपनीचं दुसऱ्यांदा नुकसान झालं.

डावखुऱ्या नेहल वढेराने उत्तुंग फटका मारला आणि मैदानाबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर जाऊन आदळला. गाडीच्या दरवाजावर जाऊन बरोबर हँडलच्या वर लागला. यामुळे गाडीला डेंट आला. असं या स्पर्धेत दुसऱ्यांदा झालं आहे. यापूर्वी ऋतुराज गायकवाडने गाडीचं नुकसान केलं होतं.

टाटा आयपीएल 2023 चे अधिकृत प्रायोजक आहेत. यामुळे मैदानात टाटा टियागो ईवी कार मैदानात ठेवली जाते. फलंदाजाने फटका मारला आणि तो थेट मैदानात असलेल्या या कारला लागल्यास 5 लाख रुपये दिले जातात. टाटा समूहाकडून 5 लाख रुपयांची रक्कम कर्नाटकमधील कॉफी प्लाँट्सला मागच्या वेळेस देण्यात आली होती.

मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला 6 विकेट्स आणि 21 चेंडू राखून पराभूत केलं. मोठ्या विजयामुळे मुंबईला जबरदस्त फायदा झाला आहे. मुंबईने गुणतालिकेत 12 गुणांसह तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे मुंबईचं प्लेऑफचं स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड