टीम इंडियाचा श्रीलंका दौरा आटोपला. टीम इंडियासाठी हा दौरा संमिश्र राहिला. टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने 3-0 ने मालिका जिंकली. त्यानंतर मात्र श्रीलंकेने इतिहास रचला. श्रीलंकेने टीम इंडियाला 27 वर्षांनंतर 3 सामन्यांच्या द्विपक्षीय मालिकेत 2-0 ने पराभूत केलं. आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाच्या पुढील मालिकेचे वेध लागले आहेत. टीम इंडियाची पुढील मालिका केव्हा आहे? ती मालिका कोणती आणि कुणाविरुद्ध आहे? हे आपण जाणून घेऊयात.
टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्यानंतर पुढील मालिकेत तब्बल 43 दिवसांचं अंतर आहे. टीम इंडियाची ब्लू आर्मी ही 19 सप्टेंबरला मदैानात उतरणार आहे. भारतासमोर बांगलादेशचं आव्हान असणार आहे. उभयसंघात कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी बांगलादेश भारत दौऱ्यावर येणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही मालिका असणार आहे. त्यानंतर 3 सामन्यांची टी20i मालिका होईल. कसोटी मालिका 19 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर 6 ते 12 ऑक्टोबर दरम्यान टी 20i मालिका होणार आहे.
पहिला कसोटी सामना, 19-23 सप्टेंबर
दुसरा कसोटी, 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर
पहिला सामना, 6 ऑक्टोबर, धर्मशाळा
दुसरा सामना, 9 ऑक्टोबर, दिल्ली
तिसरा सामना, 12 ऑक्टोबर, हैदराबाद
बांगलादेशनंतर टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. न्यूझीलंड भारताचा दौरा करणार आहे. न्यूझीलंड या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर 1 नोव्हेंबरपासून तिसरा आणि अखेरचा सामना खेळवण्यात येईल.
पहिला सामना, 16-20 ऑक्टोबर, बंगळुरु
दुसरा सामना, 24-28 ऑक्टोबर, पुणे
तिसरा सामना, 1-5 नोव्हेंबर, मुंबई