राजकोट | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी 130.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 445 धावा केल्या. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्मा याने सर्वाधिक 131 धावा केल्या. लोकल बॉय रवींद्र जडेजा याने 112 धावांची शतकी खेळी केली. तर डेब्युटंट सरफराज खान आणि ध्रुव जुरेल या जोडीने उल्लेखनीय कामगिरी केली. सरफराज खान याने 62 आणि ध्रुव जुरेल याने 46 धावांचं योगदान दिलं. तर आर अश्विन याने 37 तर अखेरीस जसप्रीत बुमराह याने निर्णायक 26 धावा जोडल्या.
टीम इंडियाने पहिल्या दिवशी कॅप्टन रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद शतकाच्या जोरावर आणि सरफराज खानने पदार्पणात केलेल्या 62 धावांच्या मदतीने 5 बाद 326 धावा केल्या. त्यानंतर कुलदीप यादव आणि जडेजा या जोडीने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र कुलदीप यादव 4 आणि जडेजा 112 धावा करुन झटपट आऊट झाले.
त्यानंतर आर अश्विन आणि डेब्यूटंट ध्रुव जुरेल या दोघांनी 77 धावांची निर्णायक भागीदारी केली. मात्र त्यानंतर आर अश्विन 37 आणि ध्रुव 46 धावांवर आऊट झाले. तर शेवटी जसप्रीत बुमराहने जोरदार बॅटिंग करत 26 धावा केल्या. मार्क वूड याने बुमराहला एलबीडब्लू करत टीम इंडियाला ऑलआऊट केलं. मोहम्मद सिराज हा 3 धावांवर नाबाद परतला. इंग्लंडकडून मार्क वूड याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. रेहान अहमदने दोघांना आऊट केलं. तर जेम्स एंडरसन, टॉम हार्टली आणि जो रुट या तिघांनी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाचा पहिला डाव 445 धावांवर आटोपला
India end up with a big first-innings total in Rajkot 👌#WTC25 | #INDvENG 📝: https://t.co/rnv6HVulU1 pic.twitter.com/UPcAtLznF7
— ICC (@ICC) February 16, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.