मुंबई | टीम इंडियाने केएल राहुल याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 99 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांची मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाने या विजयासह वर्ल्ड कपआधी आम्ही तयारी असल्याचं जाहीर केलंय. आता या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना हा राजकोटमध्ये 27 सप्टेंबर रोजी खेळणार आहे. टीम इंडियाचा वर्ल्ड कपआधीचा हा अखेरचा सामना असणार आहे. मात्र त्याआधीच टीम इंडियाच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा ऑलराउंडर हा दुखापतीमुळे तिसऱ्या वनडेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.
टीम इंडियाचा ऑलराउंडर अक्षर पटेल दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या वनडेतून बाहेर झाला आहे. अक्षरसाठी वर्ल्ड कपआधी आपण फिट असल्याचं सिद्ध करण्याची ही अखेरची संधी होती. मात्र आता दुखापतीने ती संधी हि हिरावली आहे. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय. तर टीम इंडियाचा पहिला सामना हा 8 ऑक्टोबरला आहे. आता अक्षरची वर्ल्ड कप टीममध्ये निवड करण्यात तर आलीय. मात्र दुखापतीने टेन्शन वाढवलंय.
काही दिवसांपूर्वीच आशिया कप 2023 स्पर्धा पार पडली. टीम इंडियाने अंतिम सामन्यात श्रीलंकेवर 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आठव्यांदा आशिया कप जिंकला. अक्षरला या स्पर्धेदरम्यानच दुखापत झाली होती. त्यामुळे अक्षरच्या जागी अंतिम सामन्यात वॉशिंग्टन सुंदर याला संधी देण्यात आली होती. तेव्हापासून अक्षर या दुखापतीच्या जाळ्यात फसलाय. त्यामुळे अक्षरला तिसऱ्या सामन्यात खेळता येणार नसल्याचं क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. मात्र अक्षर तिसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
दरम्यान अक्षरच्या तिसऱ्या सामन्याबाबत बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं होतं. अक्षर पूर्णपणे फिट असेल तरच त्याला तिसऱ्या सामन्यात खेळता येईल, असं बीसीसीआयने 18 सप्टेंबर दरम्यान सांगितलं होतं.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.
तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या, (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल*, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी आणि मोहम्मद सिराज.