IND vs BAN : बांगलादेशविरूद्ध टीम इंडियाची घोषणा, बिहारच्या खेळाडूचं दमदार कमबॅक

| Updated on: Sep 08, 2024 | 10:08 PM

Team India announced for Bangladesh Series : बीसीसीआयडकडून बांगलादेशविरूद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीमची घोषणा करण्यात आली आहे. या टीममध्ये बिहारच्या खेळाडूची निवड झाली आहे. एक सामना खेळून बाहेर पडल्यानंतर त्याने पुन्हा जोरदार कमबॅक केलं आहे.

IND vs BAN : बांगलादेशविरूद्ध टीम इंडियाची घोषणा, बिहारच्या खेळाडूचं दमदार कमबॅक
Follow us on

टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका येत्या 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत, तर दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये पार पडणार आहे. यामधील पहिल्या कसोटीसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून विराट कोहली, केएल राहुल आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतही कसोटी संघात पुनरागमन करणार आहेत. हे तिघेही इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या मालिकेत सहभागी झाले नव्हते. सर्फराज खान आणि यष्टिरक्षक ध्रुव जुरेल यांचा मधल्या फळीत समावेश करण्यात आला आहे. तर विराट कोहली, के. एल. राहुल आणि ऋषभ पंत यांनीही कमबॅक आहे. या मालिकेसाठी बिहारच्या खेळाडूची निवड झाली आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून आकाश दीप आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर त्याने टीममध्ये आपली जागा पुन्हा मिळवली. भारत अ संघाकडून खेळताना त्याने एकाच सामन्यात नऊ विकेट घेतल्या होत्या. आकाश दीप हा बिहारचा आहे.  2019 मध्ये बंगालकडून डेब्यू केला होता.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 31 सामने खेळताना त्याने 23.70 च्या सरासरीने एकूण 107 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये त्याने चार वेळा एका डावात 5 विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे.तर सात वेळा एका डावात 5 विकेट घेण्यासोबतच त्याने एका सामन्यात 10 विकेट्सही घेतल्या आहेत.

 

रोहित शर्मा C), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (WK), ध्रुव जुरेल (WK), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल.