Asia Cup 2023 Final आधी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार ऑलराऊंडर अंतिम सामन्यातून बाहेर

| Updated on: Sep 16, 2023 | 11:08 PM

Indian Cricket Team Asia Cup 2023 Final | टीम इंडियाने आशिया कप उंचावण्यासाठी जबरदस्त तयारी केलीय. मात्र टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू अंतिम सामन्यातून 'आऊट' झालाय.

Asia Cup 2023 Final आधी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार ऑलराऊंडर अंतिम सामन्यातून बाहेर
Follow us on

कोलंबो | टीम इंडिया गतविजेत्या श्रीलंका विरुद्ध आशिया कप 2023 फायनलमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. हा सामना 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता सुरु होणार आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. नेट्समध्ये जोरदार सराव केला आहे. मात्र सामन्याच्या काही तासांआधी टीम इंडियाच्या गोटातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार मॅचविनर ऑलराउंडर हा श्रीलंका विरुद्धच्या अंतिम सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.

टीम इंडियाचा अष्टपैलू अक्षर पटेल हा दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. बीसीसीआयने ट्विट करत अक्षर पटेल हा दुखापतीमुळे आशिया कप 2023 फायनलमध्ये खेळणार नसल्याची माहिती दिली आहे. अक्षरला बांगलादेश विरुद्ध सुपर 4 मधील अखरेच्या सामन्यात 15 सप्टेंबर रोजी दुखापत झाली होती. हीच दुखापत टीम इंडियाला आणि वैयक्तिक पातळीवर अक्षर पटेल याच्यासाठी नुकसानकारक ठरली आहे. अक्षरच्या जागी ऑलराउंडरचा समावेश टीम इंडियात करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियात अक्षर पटेल याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर याचा समावेश करण्यात आला आहे. सुंदर टीम इंडियासोबत जोडला गेलाय. तसाच सुंदरने सरावही केला आहे.

बांगलादेश विरुद्ध झुंजार खेळी

अक्षर पटेलने बांगलादेश विरुद्ध झुंजार खेळी केली. टीम इंडियाचा 266 धावांचा पाठलाग करताना डाव गडगडला. मात्र शुबमन गिलने शतक ठोकत टीम इंडियाला सामन्यात कायम ठेवलं. मात्र शतकानंतर शुबमन आऊट झाला. शुबमननंतर अक्षरने खिंड लढवली. अक्षरने अखेरच्या काही षटकांपर्यंत लढत दिली मात्र निर्णायक क्षणी आऊट झाला. अक्षर 42 धावांवर आऊट झाल्याने टीम इंडियाच्या विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या. अक्षरने आठव्या स्थानी येत 34 बॉलमध्ये 3 चौकार आणि 2 कडक षटकारांच्या मदतीने 42 धावांची खेळी केली. तर 1 विकेटही घेतला.

अक्षर पटेल ‘आऊट’


आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा.

श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलांका, धनंजय डी सिल्वा, मथीशा पथिराना, सदीरा समरविक्रमा, महीश थेक्षाना, दुनिथ वेललागे, कासुन राजिथा, दुशान हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.