मुंबई | टीम इंडिया इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत मजबूत स्थितीत आहे. पहिला सामना गमावल्यानंतर रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं. यशस्वी जयस्वाल याने केलेल्या सलग 2 द्विशतकांच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडला धुळ चारली. टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना हा 23 फेब्रुवारीपासून रांचीत होणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीआधी टीम इंडियात केएल राहुल याचं कमबॅक होऊ शकतं. केएल राहुल दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही. केएलच्या जागी टीम इंडियात रजत पाटीदार याचा समावेश करण्यात आला होता. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, केएल चौथ्या सामन्यातून कमबॅक करु शकतो. त्यामुळे रजत पाटीदार याला टीमबाहेर बसावं लागू शकतं.
बीसीसीआयच्या एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “केएल राहुल पूर्णपणे फिट होण्यास सज्ज आहे. तसेच केएस टीम इंडियासह जोडला जाऊ शकतो.” केएल राहुलला दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यातून बाहेर बसावं लागलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल जवळपास 90 टक्के बरा झाला आहे. आता तो सामना खेळण्यासाठी पूर्णपणे बरा होईल. तो रांचीत होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी उपलब्ध होईल.
दरम्यान चौथ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा उपकर्णधार आणि बॉलिंग ग्रुपचा हेड जसप्रीत बुमराह याला विश्रांती दिली जाऊ शकते.
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप आणि रवींद्र जडेजा.
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर, ऑली रॉबिन्सन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.