Virat Kohli Anuska Sharma : क्रिकेटपासून लांब विराट कोहली…, पत्नी अनुष्कासोबत पोहचला वृंदावनला, पाहा फोटो

| Updated on: Jan 04, 2023 | 8:11 PM

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासह वृंदावनला पोहचला आहे. विराटला श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.

Virat Kohli Anuska Sharma : क्रिकेटपासून लांब विराट कोहली..., पत्नी अनुष्कासोबत पोहचला वृंदावनला, पाहा फोटो
Image Credit source: social media
Follow us on

Virat Kohli : टीम इंडियाचा (Indian Cricket Team) आक्रमक फलंदाज विराट कोहली सध्या आपल्या कुटंबासोबत वेळ घालवत आहे. विराट आपली पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत वृंदावनला पोहचला आहे. विराटचे वृंदावनमधील (Virat Kohli At Vrundavan) फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. (team india batter virat kohli and his wife actress anushka sharma visited to vrindavan neem karoli baba)

विराट देवदर्शनाला गेलाय. तिथे विराट पूर्णवेळ आपल्या कुटुंबाला देत आहे. विराट आणि अनुष्का या यात्रेदरम्यान बाबा नीम करौली यांच्या आश्रमालाही भेट दिली.

“विराट-अनुष्का सध्या देवदर्शन करत आहेत. दोघेही बुधवारी दुपारी वृंदावनला पोहचले. मात्र दोघेही ठरलेल्या वेळेच्या 2 तासआधीच वृंदावनला पोहचले. दोघांनी बाबा नीम करौली आश्रमाचं दर्शन घेतलं. समाधी स्थळी जाऊन पार्थना केली. दोघेही जवळपास तासभर या आश्रमात थांबले”, अशी माहिती विराटच्या मॅनेजरने दिली.

हे सुद्धा वाचा

विराटने क्रिकेटमधून काही वेळ विश्रांती घेतली आहे. विराट नुकताच बांगलादेश दौऱ्यावरुन परतलाय. विराट बांगलादेश विरुद्ध्या वनडे आणि कसोटी मालिकेत खेळला. वनडे सीरिजमध्ये विराटने शानदार कामगिरी केली. त्याने चिटगाव वनडेत 113 धावांची शतकी खेळी केली.

दरम्यान श्रीलंका भारत दौऱ्यावर आहे. उभयसंघात सध्या टी 20 मालिका सुरु आहे. या मालिकेत टीम इंडियाने विजयी सुरुवात केलीय. सध्या टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. या टी 20 मालिकेनंतर वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत विरा खेळणार आहे. त्यामुळे विराटकडून या एकदिवसीय मालिकेत शानदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.