मुंबई : आशिया कप 2023 मधील नेपाळचा सामना टीम इंडियाचा स्टार बॉलर सोडून जसप्रीत बुमराह मायदेशी का परतला याचं कारण अखेर समोर आलं आहे. (Sanjana Ganeshan have a Baby Boy) जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी आनंदाची बातमी दिली आहे. संजनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. बुमराहने आपल्या घरी आलेल्या पाहुण्याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे. दोघांनाही आपल्या बाळाचं नावसुद्धा ठरवलं आहे.
Our little family has grown & our hearts are fuller than we could ever imagine! This morning we welcomed our little boy, Angad Jasprit Bumrah into the world. We are over the moon and can’t wait for everything this new chapter of our lives brings with it ❤️ – Jasprit and Sanjana pic.twitter.com/j3RFOSpB8Q
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) September 4, 2023
आशिया कप 2023 मध्ये आज टीम इंडियाचा सामना नेपाळसोबत होणार आहे. हा सामना सोडून बुमराह माघारी परतल्याने सर्वांना धक्का बसला होता. असं कोणतं कारण होतं की ज्यामुळे त्याला एकाएकी माघारी यावं लागलं. कोणालाची काही कल्पना नव्हती. आज खरं कारण समोर आलं, संजना आणि बुमराह दोघे आई-बाबा झालेत.
आमचं छोटंसं कुटुंब आता वाढलंय आणि आमचं हृदय प्रेमाने अधिक भरलंय. आज सकाळी आमच्या आयुष्यात चिमुकला पाहुणा, अंगद जसप्रीत बुमराहचं आगमन झालं. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. आयुष्यातील या नव्या टप्प्यासोबत येणाऱ्या अनेक आनंददायी गोष्टींसाठी आम्ही खूप उत्सुक आहोत, असं जसप्रीत बुमराहने ट्विट करत म्हटलं आहे.
दरम्यान, जसप्रीत बुमराह फक्त नेपाळविरूद्धचा सामना खेळनार नाही. सुपर 4 मधील सामन्यांसाठी तो परत माघारी येणार आहे. वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर आशिया कप महत्त्वाचा असून संघात त्याने लवकरात लवकर परतावं अशी चाहत्यांची इच्छा होती.