मुंबई : वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स इंग्लंड यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 4 विकेटने पराभव झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाचा डाव 80 धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करताना इग्लंड संघाने 12 व्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं. तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेमध्ये इंग्लंड संघाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. तिसरा सामनाही उद्याच म्हणजेच रविवारी 11 डिसेंबरला वानखेडे स्टेडियमवर पार पडणार आहे. आजच्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर देताना संघाचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.
आजच्या सामन्यात आणखी 30 ते 40 धावा केल्या असत्या तर मोठा फरक पडला असता. मला माझ्या संघाचा अभिमान आहे कारण शेवटच्या रनपर्यंत आम्ही लढलो. एक सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आम्हाला खेळायचं आहे. आजच्या सामन्यात दुर्दैवाने फलंदाजांना चेंडूंचा अंदाज आला नाही. इंग्लंडच्या संघाने चांगली गोलंदाजी केली, आम्हाला धावा काढताना अंकुश लावला होता. लवकर विकेट गमावल्यामुळे आम्ही 120 धावा ठेवण्याचं लक्ष्य होतं पण ते यशस्वी होऊ शकलं नसल्याचं हरमनप्रीत कौर यांनी म्हटलं आहे.
आजच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची एकदम खराब सुरूवात झाली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये शफाली वर्मा शून्यावर बाद झाली होती. त्यानंतर फक्त जेमिमाह रॉड्रिग्स हिने एकटीने 30 धावांची चिवट खेळी केली. त्यासोबतच स्मृती मंधाना 10 धावांवर बाद झाली होती. मात्र त्यानंतर कोणत्याच खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.
दरम्यान, इंग्लंड संघाकडून अॅलिस कॅप्सी 25 धावा आणि नॅट सायव्हर-ब्रंट 16 धावा केल्या होत्या. कॅप्टन हीदर नाइट नाबाद 7 धावा आणि सोफी एक्लेस्टोन नाबाद 9 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (wk), दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, पूजा वस्त्राकर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक
इंग्लंड महिला (प्लेइंग इलेव्हन): सोफिया डंकले, डॅनिएल व्याट, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, हीदर नाइट (C), एमी जोन्स (Wk), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, शार्लोट डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल