मुंबई | टीम इंडिया विरुद्ध विंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. विंडिजने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलंय. कॅप्टन रोहित शर्मा आणि आणि यशस्वी जयस्वाल या सलामी जोडीने लंच ब्रेकपर्यंत 131 रन्सची पार्टनरशीप केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतकं पूर्ण केली. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. यानंतर उभयसंघात एकदिवसीय आणि टी 20 मालिका होणार आहे. यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन बदलू शकतो. बीसीसीआय अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यामुळे एकच चर्चा सुरु झाली आहे.
टीम इंडिया विंडिज दौऱ्यानंतर आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20 मालितका खेळणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने होणार आहेत. रोहित शर्मा सातत्याने क्रिकेट खेळतोय. त्यामुळे या मालिकेसाठी आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर रोहितला विश्रांती मिळणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे टीम इंडियाची कॅप्टन्सी कोण करणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.
आयर्लंड विरुद्धच्या या मालिकेसाठी रोहित शर्मा याच्यासह टीम इंडियाचा टी 20 कर्णधार हार्दिक पंड्या, शुबमन गिल आणि इशान किशन या चौघांना विश्रांती देण्यात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी कर्णधारपदाचा पेच आणखी वाढला आहे.
हार्दिक पंड्या टीम इंडियाचा प्रमुख खेळाडू आहे. तो बॉलिंग, फिल्डिंग आणि बॅटिंग अशा तिन्ही आघाड्यांवर कामगिरी करतो. त्यामुळे निवड समिती हार्दिकबाबत वर्ल्ड कप पाहता जोखीम घेणार नाही.
” आतापर्यंत काहीही निश्चित नाही. विंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेनंतर हार्दिक काय स्थितीत आहे, यावरुन सर्व ठरेल कारण टीम इंडियाला मोठा प्रवास करायचा आहे. वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर खेळाचा ताण कमी करणं महत्वाचं आहे. तसेच वर्ल्ड कपमध्ये हार्दिक उपकर्णधारही असेल”, अशी वृत्त पीटीआयने बीसीसीआ सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
दरम्यान टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्याला 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील एकूण 3 सामने हे अनुक्रमे 18, 20 आणि 23 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेत टीम इंडियाकडून युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया टी 20 मालिका वेळापत्रक
पहिला सामना, आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, 18 ऑगस्ट.
दुसरा सामना, आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, 20 ऑगस्ट.
तिसरा सामना, आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, 23 ऑगस्ट.