INDvsAUS | रोहित शर्मा याच्याकडून रविंद्र जडेजा याला शिवीगाळ, व्हीडिओ व्हायरल

| Updated on: Mar 01, 2023 | 6:38 PM

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशा केली.

INDvsAUS | रोहित शर्मा याच्याकडून रविंद्र जडेजा याला शिवीगाळ, व्हीडिओ व्हायरल
Follow us on

इंदूर | टीम इंडिया इंदूरमधील तिसऱ्या कसोटीत सपशेल अपयशी ठरली. टीम इंडिया पहिल्या डावात अवघ्या 109 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला तिशीचा आकडा गाठता आला नाही. टीम इंडियाकडून विराट कोहली याने सर्वाधिक 22 धावा केल्या. ओपनर शुबमन गिल याने 21 धावांचं योगदान दिलं. उमेश यादव आणि श्रीकर भरत या दोघांनी प्रत्येकी 17 धावा जोडल्या. कॅप्टन रोहित शर्मा 12 धावांवर मोठा फटका मारण्याच्या नादात स्टंपिग आऊट झाला.

अक्षर पटेल 12 धावांवर नाबाद परतला. तर रविंद्र जडेजा 4, आर अश्विन याने 3 तर चेतेश्वर पुजारा याने 1 धाव केली. तर श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. दरम्यान त्यानंतर ऑस्ट्रेलिया बॅटिंगसाठी मैदानात आली. तेव्हा रोहितने रविंद्र जडेजाला या भरमैदानात शिवीगाळ केली. या शिवीगाळ केल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

नक्की काय झालं?

पहिल्या डावात टीम इंडिया सपशेल अपयशी ठरली. त्यामुळे कॅप्टन रोहित आधीच टेन्शनमध्ये होता. ऑस्ट्रेलियाच्याच्या पहिल्या डावातील बॅटिंगला सुरुवात झाली होती. टीम इंडिया विकेटच्या शोधात होती. या दरम्यान रोहितने जडेजाला शिव्या घातल्या. व्हायरल व्हीडिओत रोहित शिव्या देताना दिसतोय. हा सर्व प्रकार 11 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर घडला.

रोहित शर्मा संतापला

दरम्यान ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला स्वसतात गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियालाने पहिली विकेट 12 धावांवर गमावली. मात्र त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. दरम्यान ऑस्ट्रेलियाने मोठ्या आघाडीच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | स्टीवनन स्मिथ (कर्णधार), उस्मान ख्वाजा, ट्रॅविस हेड, मार्नस लाबुशेने, पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स केरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियोन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुह्नमैन.