टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या कॉन्सर्टला टीम इंडियाच्या खेळाडूंनी हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये रोहित शर्मा आणि नीता अंबानी एकमेकांना मिठी मारली. यावेळी नीता अंबानी भावनिक झाल्या होत्या, इतकंच नाहीतर त्यांना अश्रू अनावर झाले. नीता अंबानींनी टीम इंडियाच्या विजयाचा आनंदही या संगीत सोहळ्यामध्ये साजरा केला.
आज माझे मुंबई इंडियन्सचे कुटुंबच आले आहे. आजची रात्र उत्साहाची असून अनंत आणि राधिका यांच्या संगीत सोहळ्यामध्ये टीम इंडियाच्या विजयाचा आनंदही साजरा करणार आहोत, असं नीता अंबानी म्हणाल्या.
Nita Ambani started crying while hugging Rohit Sharma. She had betrayed same Rohit seven months ago.
Now, they realize the real value of Rohit Sharma, when everyone from Antilia to Wankhede is chanting his name. 🔥 pic.twitter.com/spIXKruRP5
— Selfless⁴⁵ (@SelflessRohit) July 6, 2024
रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचं खास कनेक्शन आहे. 2013 साली रोहित शर्माकडे मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर रोहित शर्माने आपल्या नेतृत्त्वात टीमला पाच विजेतेपद जिंकून दिली आहेत. मात्र 2024 म्हणजेच यंदाच्या वर्षी रोहित शर्माची कर्णधारपदाची जबाबदारी काढली. हार्दिक पंड्याला कर्णधारपद करण्यात आलं होतं, मात्र हा निर्णय रोहितच्या चाहत्यांना आवडला नव्हता.
हार्दिक पंड्याला भर सामन्यात चाहते चिडवत होते. छपरी म्हणूनही त्यांना हिणवलं गेलं. मात्र त्याने हार मानली नाही. मुंबई इंडियन्सला काही यश मिळाली नाही, पण वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पंड्याने चमकदार कामगिरी केली.