Rohit Sharma | धोनीच्या रांचीत रोहितचा पारा चढला, भर मैदानात नक्की काय म्हणाला?

| Updated on: Feb 23, 2024 | 5:42 PM

Rohit Sharma Angry | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याचा पारा पुन्हा एकदा चढलेला आहे. रोहितने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या सामन्यातील पहिल्याच दिवशी संताप जाहीर केलाय. नक्की काय झालं?

Rohit Sharma | धोनीच्या रांचीत रोहितचा पारा चढला, भर मैदानात नक्की काय म्हणाला?
Follow us on

रांची | रोहित शर्मा, टीम इंडियाचा कॅप्टन, अनुभवी खेळाडू आणि नव्या दमाच्या युवा क्रिकेटपटूंच्या हक्काचा मोठा भाऊ आणि मेंटॉर. रोहितचा सामन्यादरम्यान मैदानात आणि मैदानाबाहेर वावरण्याचा अंदाज, बोलण्याची पद्धत आणि मनात ते ओठात असा सरळसाधा आणि रोखठोक स्वभाव प्रत्येक क्रिकेट चाहत्याला माहित आहे. एखाद्या खेळाडू किंवा आपल्या टीमला गाईड करताना बोलण्याची स्टाईल आणि त्याचे हातवारे, या पद्धतीमुळे रोहित प्रत्येकाला आपल्यातलाच वाटतो. रोहित मैदानात कधी हसतो, कधी गंभीर होतो, तर कधी संतापतोही, हे आतापर्यंत क्रिकेट चाहत्याने नक्कीच पाहिलं असेल.

आता रोहित शर्मा पुन्हा एकदा भडकला आहे. रोहित इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिल्या दिवशी हा अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. नक्की कशामुळे रोहित खवळला? मैदानात नक्की असं काय झालं? हे आपण व्हायरल व्हीडिओच्या मदतीने सविस्तर जाणून घेऊयात.

नक्की मॅटर काय?

रवींद्र जडेजाच्या बॉलिंगवर टीम इंडियाने इंग्लंडच्या जो रुट याच्या विरोधात रीव्हीव्यू घेतला. सर्व तिसऱ्या अंपायरच्या निर्णयाची प्रतिक्षा करत होते. अंपायरचा निर्णय काय असणार? याबाबत प्रत्येकाला उत्सूकता होती. हा निर्णय स्टेडियममधील मोठ्या स्क्रिनवर दाखवला जातो. मात्र या वेळेस रोहित शर्माला बिग स्क्रीनवर दाखवण्यात आलं. स्वत:ला बिग स्क्रीनवर पाहून रोहितचा पारा चढला. मग काय भडकला ना भाऊ. रोहितने कॅमेऱ्याकडे हातवारे केले. “मला काय दाखवतोय रिप्ले दाखव”, असं रोहित हातवारे आणि इशारा करत म्हणाला. रोहितचा हा अवघ्या काही सेकंदाचा व्हीडिओ व्हायरल झालाय.

आणि रोहित भडकला


टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.